पुरलेला मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार; तालिबान्यांचे धक्कादायक कृत्य

  काबूल : तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानात हा:हा:कार माजला आहे. पुरलेला मृतदेह बाहेर काढून त्यावर बलात्कार केल्याचे धक्कादायक कृत्य तालिबान्यांनी केले आहे.

  अफगाणिस्तावर विजय मिळवताच तालिबानने महिलांवर क्रुर कायदे लावले आहेत. तालिबानच्या भितीने भारतात पळून आलेल्या एका महिलेने भयानक अनुभव सांगितला आहे. तालिबान्यांनी क्रूरतेचा कळस गाठला असून ते महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार करत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तालिबानी अफगाणिस्तानातील प्रत्येक घरातून एक मुलगी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही या महिलेने केला आहे.

  तालिबानी घरात घुसून महिलांचे अपहरण करत आहेत. महिलांवर अत्याचार करुन त्यांना गोळ्या घालून ठार मारले जात असल्याचेही या महिलेचे म्हणणे आहे.

  दुसऱ्यांना दाखवू नये चेहरा

  जर एखाद्या घराच्या तळमजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर महिला राहते, तर ती राहात असलेल्या घराच्या खिडकीवर रंग करण्यात येतो किंवा त्यावर अशी स्क्रीन लावण्यात येते की, आतील महिला कोणालाही कोणत्याही परिस्थितीत दिसू शकणार नाही. महिलांना वयाच्या आठ वर्षांनंतर शिक्षित होण्याची परवानगी नसते व तोपर्यंत त्यांना केवळ कुराणचाच अभ्यास करण्याची परवानगी असते.

  छायाचित्र लावू नये

  तालिबानी नियमांनुसार, महिलांचे व्हीडिओ बनविणे, फोटोग्राफी करणे तसेच त्यांचे छायाचित्र वृत्तपत्र किंवा घरात लावले जाऊ शकत नाही. याशिवाय पुरुष आपल्या फोनमध्येही पत्नीचे छायाचित्र ठेवू शकत नाही. असे करणे तालिबानी नियमांच्या विरोधात मानले जाते. नुकतेच सरकार पूर्णपणे पडल्यानंतर पूर्वी ज्या भागात तालिबानचा ताबा होता, तिथे नाही लोकांचे फोन यासाठी फोडण्यात आले, कारण त्यात महिलांची छायाचित्रे होती.

  महिला वृत्त निवेदकांवर बंदी

  अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने महिला वृत्त निवेदकांवर बंदी घातली आहे. सरकारी वृत्तवाहिनीच्या महिला वृत्त निवेदकांना तालिबानने नोकरीवरून हटविले आहे. आता तालिबानी अँकर टीव्हीवर बातम्या सांगतील. खदीजा अमीना नावाची महिला सरकारी वृत्त वाहिनीवर निवेदक होती, तिलादेखील पदावरून काढण्यात आले आहे.

  एक दिवसापूर्वीच तालिबानने सांगितले होते की, महिलांच्या हिताचे रक्षण होईल. परंतु आता फक्त शरीयत कायद्यांतर्गतच महिलांना काम करण्यास परवानगी असल्याचे तालिबान सांगत आहे. नोकरीवरून काढल्यानंतर अफगाण वृत्त निवेदक खदीजा अमीना यांनी सांगितले की, मी काय करू, पुढच्या पीढीकडे काहीच काम असणार नाही. 20 वर्षांत जे काही मिळविले, ते सर्व गमावले. तालिबानी तालिबानी आहेत, ते बदलले नाहीत.

  असे आहेत तालिबानी नियम

  1. हाय हिल्सवर बंदी
  2. भडक रंगाच्या नेलपॉलिशला परवानगी नाही
  3. पायात काय घालायचे? याचा निर्णय तालिबान घेणार
  4. महिलांचे छायाचित्र वृत्तपत्रात किंवा घरात लावण्यास मज्जाव
  5. कोणालाही चेहरा दाखवू नये
  6. फक्त कुराणचाच अभ्यास करावा
  7. शरीयत कायद्यांतर्गतच महिलांना काम करण्यास परवानगी