Rapist will get severe punishment in Pakistan, rapist will be made

पाकिस्तान सरकारने बलात्कारविरोधी कायदा आणला असून या कायद्यांतर्गत प्रकरणाचा तपास आणि सुनावणी ४ महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही करण्यात येणार आहे.

लाहोर : पाकिस्तान सरकारने (Pakistan Government) मोठे पाऊस उचलत बलात्कार रोखण्यासाठी नवीन कायदा गठीत केला आहे. पाकिस्तानात बलात्काराची प्रकरणे रोखण्यासाठी पाक सरकारने बलात्कारविरोधी कायदा (Law Against Rape) आणला आहे. यावर पाकिस्तान राष्ट्रपतींनी काही महिन्यांपूर्वीच स्वाक्षरी केली आहे. या कायद्यांतर्गत बलात्कारी आरोपीला (Rapist ) नंपूसक (severe punishment) बनवण्यात येणार आहे.

काय आहे बलात्कार विरोधी कायद्यात

पाकिस्तान सरकारने बलात्कारविरोधी कायदा आणला असून या कायद्यांतर्गत प्रकरणाचा तपास आणि सुनावणी ४ महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही करण्यात येणार आहे. कायद्यांतर्गत बलात्कारी गुन्ह्यांचे नॅशनल रजिस्टर करण्यात येणार आहे. तर पिडितेची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात येणार आहे.

बलात्काऱ्याला या कायद्यात कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. बलात्कारी प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित आोपीला औषधी देऊन नंपुसक बनवण्यात येणार आहे. असे कायद्यात म्हटले आहे.