python with smiley face

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये स्नेक ब्रीडर जस्टिन कोबिल्का (Justin Kobilka) १९ वर्षांपासून अजगरांचं ब्रीडिंग (Python Breeding) करतात. यावेळी त्यांनी बॉल पायथॉनचं जे ब्रीडिंग केलं त्यातून पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग असलेला आणि पिवळ्या रंगाचे स्माईली असणारा अजगर(python with smiley) जन्माला आला.

    जॉर्जिया : सोशल मीडियाच्या(social media) या युगात इमोजी आणि स्माईलीचा(smiley) वापर प्रत्येकजण करत आहे. मात्र अमेरिकेत असा अजगर आहे ज्याच्या अंगावर स्माईली(python with smiley) आहेत. पांढऱ्या रंगाच्या या अजगराच्या शरीरावर पिवळ्या रंगाच्या स्माईली आहेत. त्याचे फोटो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    अमेरिकेतील जॉर्जियामध्ये स्नेक ब्रीडर जस्टिन कोबिल्का (Justin Kobilka) १९ वर्षांपासून अजगरांचं ब्रीडिंग (Python Breeding) करतात. यावेळी त्यांनी बॉल पायथॉनचं जे ब्रीडिंग केलं त्यातून पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग असलेला आणि पिवळ्या रंगाचे स्माईली असणारा अजगर जन्माला आला.

    जनुकीय बदलामुळे अजगराच्या त्वचेवर हा पॅटर्न आला असल्याचं मिळाल्याचं जस्टिन कोबिल्का यांचं म्हणणं आहे. लवेंडर अल्बिनो पाइबाल्ड बॉल पायथन असं या अजगराचं नाव आहे.

    जस्टिन कोबिल्का यांच्या मते, दर २० प्राण्यांमागे एका प्राण्याच्या शरीरावर अशा स्माईली असतात. हा अजगर त्यांनी तब्बल ६००० डॉलर्स अर्थात ४.३७ लाख रुपयांना विकला.सापाच्या या स्माईली अवताराचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. लोकांना या अजब – गजब सापाचे खूप कौतुक वाटत आहे.