Record snowfall in the United States; Broke the 140 year record

हवामान विभागानुसार, सामान्यपणे अमेरिकेत मार्चमध्ये हिमवृष्टी होत नाही. यादरम्यान येथील तापमान १० ते १५ डिग्रीदरम्यान असते. परंतु सायबेरियाकडून येणाऱ्या थंड हवेमुळे ही हिमवृष्टी होत आहे. तापमान उणे ११ पर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी मार्च १८८१ मध्ये २४ इंच हिमवृष्टी झाली होती.

    वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या खूप हिमवृष्टी होत आहे. एका महिन्यात झालेल्या दुसऱ्या हिमपातामुळे गेल्या १४० वर्षांचा विक्रम तोडला आहे.  कोलोराडो, व्योमिंग व नेब्रास्कासहित ६ राज्यांमध्ये ४८ तासांत ५ फुट बर्फ पडला आहे.

    यामुळे ८० पेक्षा अधिक महामार्ग बंद झाले आहे. दोन दिवसांत २४०० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहे. तसेच या हिमवृष्टीमुळे ३५ लाख लोक प्रभावित झाले आहेत.