मास्क घालायला दिला नकार ; महिलेविरोधात ‘अटक वॉरंट’ जारी

गुल्वेस्टॉनमधील बॅंक ऑफ अमेरिकात गुरुवारी हे नाट्य घडले. बॅंकेतील ऑफिसर्स बॉडी कॅमेऱ्यात या महिलेने मास्क न घातल्याचे आढळून आले होते. बॅंक मॅनेजरने या महिलेविषयी पोलिसांकडे तक्रार केली. तिने पोलिसांचेही ऐकले नाही आणि तिला जायला सांगितले, तर तिने तेही ऐकले नाही.मास्क न घातल्याबद्दल विचारणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला या महिलेने 'काय करणार, अटक करणार का ?' असे उघड आव्हानच टेरी राईट या ओरेगॉनमधील ६५ वर्षीय महिलेने दिले होते.

    गॅल्वेस्टॉन : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. अनेक देश कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. अनेक देशांनी टाळेबंदीचा मार्ग अवलंबला आहे तर काहींनी कडक निर्बंध लादून जनजीवन सुरळीत ठेवली आहे. अमेरिकतेही कडक निर्बंध लादले आहेत. टेक्‍सास बॅंकेत मास्क घालण्यास नकार देणाऱ्या महिलेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

    गुल्वेस्टॉनमधील बॅंक ऑफ अमेरिकात गुरुवारी हे नाट्य घडले. बॅंकेतील ऑफिसर्स बॉडी कॅमेऱ्यात या महिलेने मास्क न घातल्याचे आढळून आले होते. बॅंक मॅनेजरने या महिलेविषयी पोलिसांकडे तक्रार केली. तिने पोलिसांचेही ऐकले नाही आणि तिला जायला सांगितले, तर तिने तेही ऐकले नाही.मास्क न घातल्याबद्दल विचारणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला या महिलेने ‘काय करणार, अटक करणार का ?’ असे उघड आव्हानच टेरी राईट या ओरेगॉनमधील ६५ वर्षीय महिलेने दिले होते.म्हणून पोलिसांना कारवाईचा निर्णय घ्यावा लागला आणि तिच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले. याशिवाय अटकेला विरोध करणे आणि गुन्हेगारी घुसखोरीचे आरोपही या महिलेवर लावण्यात आले आहेत.