कोरोना संकटातून मिळणार मुक्ती, जागतिक आरोग्य संघटनेनी दिली माहिती

टेड्रोस एडहोम गेब्रेयेसूस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे संकट टळण्यास आणखी २ वर्षांचा काळ लागणार आहे. २ वर्षांनी कोरोनाला संपवण्यात यश मिळेल असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की कोरोनामुळे सर्वांना आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टींचे महत्त्व समजले आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सिंगचा फायदा झाल्याही त्यांनी सांगितले.

जिनिव्हा : मार्चपासून देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. जगभरातील अनेक देश कोरोनावरील लसीचा शोधात आहेत. कोरोनामुळे जगावर मोठे संकट ओढावले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे हे संकट कधी दुर होतंय याच्या प्रतिक्षेत सर्व जनता आहे.

अतिशय वेगाने वाढणाऱ्या कोरोना संकटाला संपूर्ण जग सोमोरे गेले आहे. यामुळे या संकटातून मुक्ती कदी मिळणार यावर जागतिक आरोग्य संघटनेने खुलासा केला आहे. आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी यावर उत्तर दिले आहे. टेड्रोस एडहोम गेब्रेयेसूस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे संकट टळण्यास आणखी २ वर्षांचा काळ लागणार आहे. २ वर्षांनी कोरोनाला संपवण्यात यश मिळेल असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की कोरोनामुळे सर्वांना आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टींचे महत्त्व समजले आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सिंगचा फायदा झाल्याही त्यांनी सांगितले.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सध्याच्या घडीला लसींच संशोधन सुरु आहे. त्यामुळे पुढील २ वर्षांमध्ये या जागतिक महामारीचे संकट टळेल असा अंदाज वर्तवला आहे. १९९८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीचं आदाहरण देत त्यांनी सध्याच्या घडीला हाताशी असणाऱ्या तंत्रांची तुलना केली.