प्रसिद्ध अंतराळ अभियंता केनेथ केली यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केली यांनी अमेरिकेच्या नौदलात वर्णभेदाची दरी कमी करण्यासाठीही कार्य केले. केनेथ केली यांचे २७ फेब्रुवारीला निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा रॉन केली याने दिली. ते पार्किसन्सने आजारी होते. केली यांनी रडार आणि अँटेना औद्योगिक क्षेत्रात एक डझनहून अधिक पेटंट त्यांच्या नावे केले होते.

    वॉशिंगटन : इलेक्ट्रॉनिक अभियंता (Electrical Engineer) केनेथ केली (Kenneth Kelly) यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी डिझाइन केलेल्या अँटिनामुळे चंद्रावर पोहोचण्यासाठी टीव्ही आणि रेडियोच्या प्रक्षेपणासाठी उपग्रह तयार करण्यासाठी मदत झाली आणि त्यांच्या डिझाइनमुळे नासाने (NASA) परग्रहांच्या संशोधनासाठी मंगळावर पाठविलेल्या रोव्हरमुळे संपर्क प्रस्थापित होण्यास मदत झाली.

    केली यांनी अमेरिकेच्या नौदलात वर्णभेदाची दरी कमी करण्यासाठीही कार्य केले. केनेथ केली यांचे २७ फेब्रुवारीला निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा रॉन केली याने दिली. ते पार्किसन्सने आजारी होते. केली यांनी रडार आणि अँटेना औद्योगिक क्षेत्रात एक डझनहून अधिक पेटंट त्यांच्या नावे केले होते.

    त्यांनी सुरुवातीला ह्यूज्स विमानासाठी काम केले होते. यामुळे निर्देशित मिसाइल प्रणाली आणि उपग्रह तयार करण्यासाठी मदत झाली, यामुळे पृथ्वीवर राहून अपोलो मोहिमेवर लक्ष ठेवणे शक्य झाले होते.