astronauts

अंतराळात प्रवासाला गेलेल्या प्रवाशांना हृदयासंबंधी आजारांचा त्रास होऊ शकतो. पृथ्वीवर जीव वाचवण्यासाठी त्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या प्रथमोपचार सीपीआर टेक्निकचा (CPR Technique) अंतराळात वापर करायचा झाल्यास त्यात बदल करावे लागणार आहेत.

आगामी काळात अंतराळ पर्यटन(space tourism)  सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये कुणीही अंतराळात प्रवास करू शकतो. यामुळे अंतराळात प्रवासाला गेलेल्या प्रवाशांना हृदयासंबंधी आजारांचा त्रास होऊ शकतो. पृथ्वीवर जीव वाचवण्यासाठी त्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या प्रथमोपचार सीपीआर टेक्निकचा (CPR Technique) अंतराळात वापर करायचा झाल्यास त्यात बदल करावे लागणार आहेत.

सीपीआर (Cardiopulmonary resuscitation) म्हणजेच कार्डियो पल्मनरी रेसुसाइटेशन. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत या पद्धतीचा वापर रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी होऊ शकतो. यामध्ये उपचार करणारी व्यक्ती झटका आलेल्या व्यक्तीच्या छातीवर दाब देण्याबरोबरच तोंडाने श्वास देखील देते. मात्र अंतराळात हे शक्य होत नाही.

स्पेस मेडिसीनचे तज्ज्ञ प्रोफेसर योफेन हिन्कलबेन याविषयी म्हणाले की, अद्याप कोणालाही अंतराळात हृदयविकाराचा झटका आलेला नाही. कारण आतापर्यंत केवळ शारिरीकदृष्ट्या व्यवस्थित असलेले अंतराळवीर अवकाशात गेले आहेत आणि तेही थोड्या काळासाठी. त्यामुळे अजूनपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. पण आता अंतराळ मोहीम दीर्घकालीन होणार आहेत. मंगळ आणि दुर्गम अवकाश मोहिमेसाठी तयारी देखील सुरू असून चंद्रावर दीर्घ कालावधीसाठी जाण्यासाठी मोहीम सुरू आहे. चंद्र आणि मंगळावर तर वसाहती निर्माण होऊ शकतात.

अंतराळात आपत्कालीन वैद्यकीय सेवांवर संशोधन वाढल्यास आश्चर्य वाटू नये. नुकतीच जर्मन सोसायटी ऑफ एव्हिएशन अँड स्पेस मेडिसीनचे उपाध्यक्ष प्रोफेसर योफेन हिन्कलबेन यांच्यासह स्टीफन केरकॉफ यांनी अंतराळातील सीपीआरविषयी नवीन संशोधन केलं आहे.

प्राध्यापक योफेन म्हणाले, मंगळ मोहिमेदरम्यान एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन परिस्थितीत इलेक्ट्रिकल स्ट्रोक, आघात किंवा इटोक्सिकेशनचा सामना करावा लागला तर त्या परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.  अंतराळातली  व्यवस्था खूप वेगळी आहे. अंतराळात पाच टेक्निक वापरल्या जाऊ शकतात. यामध्ये दोन स्ट्रॅपचा वापर होतो. यामध्ये रुग्ण आणि त्याला सीपीआर देणाऱ्याला जोडून ठेवतो. त्यांना क्रू मेडिकल रेस्ट सिस्टीम म्हणतात. या व्यतिरिक्त इव्हिट्स एक रूसोमोनो टेक्निक आणि एक रिव्हर्स बियरहग टेक्निक आहे. हे तिन्ही उपचार मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगत केले जातात.