स्वीडनमध्ये कुराणचा अवमान केल्यामुळे दंगे आणि जाळपोळ

अहवालात म्हटले आहे की काही कार्यकर्त्यांनी कुराण जळण्याची घटना घडवून आणली आणि त्याचा व्हिडिओ बनवून ऑनलाईन पोस्ट केला. नंतर या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभ्यतेच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्याने सांगितले की, संघटनेच्या प्रमुखांनी कुराण जाळल्याच्या घटनेचा निषेध केला आणि हे कृत्य पूर्णपणे अस्वीकार्य म्हटले आहे.

स्टॉकहोम : स्वीडनमध्ये (Sweden) दक्षिण शहर मालमो शहरात कुराण ( पेटवल्यामुळे दंगे (Riots) आणि जाळपोळ केली. या घटनेच्या निषेधार्थ ३०० लोक जमा झाल्यानंतर दंगल उसळली. पोलिसांनी सांगितले की शनिवारी दंगलखोरांनी गोळीबार केला. यात पोलिस आणि मदत सेवा दलाला लक्ष्य करण्यात आले. ज्यात अनेक पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाले. दंगलीच्या आरोपाखाली सुमारे १५ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कुरान जाळण्याच्या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी हिंसाचार भडकला.

अहवालात म्हटले आहे की काही कार्यकर्त्यांनी कुराण जळण्याची घटना घडवून आणली आणि त्याचा व्हिडिओ बनवून ऑनलाईन पोस्ट केला. नंतर या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभ्यतेच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्याने सांगितले की, संघटनेच्या प्रमुखांनी कुराण जाळल्याच्या घटनेचा निषेध केला आणि हे कृत्य पूर्णपणे अस्वीकार्य म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी लोकांना हिंसाचार संपविण्याचे आवाहन केले.