प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विधानसभा निवडणुकीचे बिहारमध्ये प्रचाराचा धडाका सुरू असतानाच मुंगेर भागात दसऱ्याच्या निमित्ताने 26 ऑक्टोबर रोजी दुर्गामाता मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या गोळीबार प्रकरणात शासनाने गुरुवारी मोठी कारवाई केली. परंतु, त्याआधीच पुन्हा एकदा याच घटनेवरून हिंसाचार उफाळून आला. मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसेविरोधात गुरुवारी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. हे आंदोलक पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ आणि एसडीओ निवासस्थानाजवळ पोहचले. येथे त्यांनी तोडोड केली. तसेच अनेक गाड्याही पेटवून दिल्या. पोलिस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

मुंगेर (Munger). विधानसभा निवडणुकीचे बिहारमध्ये प्रचाराचा धडाका सुरू असतानाच मुंगेर भागात दसऱ्याच्या निमित्ताने 26 ऑक्टोबर रोजी दुर्गामाता मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या गोळीबार प्रकरणात शासनाने गुरुवारी मोठी कारवाई केली. परंतु, त्याआधीच पुन्हा एकदा याच घटनेवरून हिंसाचार उफाळून आला. मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसेविरोधात गुरुवारी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. हे आंदोलक पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ आणि एसडीओ निवासस्थानाजवळ पोहचले. येथे त्यांनी तोडोड केली. तसेच अनेक गाड्याही पेटवून दिल्या. पोलिस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

नागरिकांचा रोष पाहता जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघांना पदावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंगेरमधील सद्यपरिस्थिती ध्यानात घेता निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावाने जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक लिपी सिंह यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच या प्रकरणाची चौकशी मगधच्या विभाग आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. पुढच्या सात दिवसांत ते आपला अहवाल सोपवणार आहेत. नव्या जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची नियुक्ती लवकरच होणार आहे.

काय आहे प्रकरण?
मुंगेर जिल्ह्याच्या दीन दयाल उपाध्याय चौकाजवळ सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबार घटनेत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर 25 हून अधिक जण जखमी झाले होते. गर्दीत कुणीतरी चालवलेल्या गोळीबारात या तरुणाचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी राजेश मीणा यांनी म्हटले होते. तर दुसरीकडे, लिपी सिंह यांनी निशस्र नागरिकांवर गोळ्या आणि काठ्या चालवण्याचे आदेश दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात.

तर, काही असामाजिक तत्वांकडून मोठा कट रचण्यात आला होता. त्यामुळे ही घटना घडली. याचा लवकरच खुलासा होईल, असे मुंगेरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या म्हटले आहे. पोलिसांवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या आरोपावर बळ प्रयोगाचे आणि गोळीबाराचे कोणतेही आदेश देण्यात आले नव्हते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.