अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला ;  ट्रम्प यांनी इराणला दिला इशारा

न्यूयॉर्क : इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या रॉकेट हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरविले आहे. यासोबतच या हल्ल्यात एकाही अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला तर सैन्य कारवाई करण्याचा सूचक इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचा फोटो ट्विट करत हे इराणमधून आल्याचा उल्लेख केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बगदादामधील आमच्या दूतावासावर रॉकेट हल्ला करण्यात आला. तीन रॉकेट यावेळी अपयशी ठरले. हे रॉकेट कुठून आले होते याचा अंदाज लावा-इराण…इराणमध्ये अमेरिकन नागरिकांवर अजून हल्ले होणार असल्याची चर्चा आम्ही ऐकत आहोत. इराणला माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. एका अमेरिकन नागरिकाचा जरी मृत्यू झाला तर यासाठी मी इराणला जबाबदार धरणार आहे. मी हे अत्यंत गांभीर्याने घेत आहे”. इराकच्या लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ग्रीन झोन परिसरातील अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. जवळपास आठ रॉकेट दूतावासावर सोडण्यात आल्याचे लष्कराने सांगितले आहे. या हल्ल्यात इराकचे अनेक सैनिक जखमी झाले असून कार आणि इमारतींचे नुकसान झाले आहे.