रशियाचे अमेरिकेला टोमणे, भारताला इशारे, पाश्चिमात्य देशांपासून जपून राहण्याचा सल्ला

पाश्चिमात्य देशांशी जवळीक वाढवल्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराच रशियानं या वक्तव्यातून दिलाय. रशियातील सरकारशी संबंधित थिंक टँक ‘रशियन इंटरनॅशनल अफेअर्स काऊन्सिल’च्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झालेल्या लावरोव यांनी हा इशारा दिलाय. रशिया आणि चीन वगळता बाकी जगातील सर्व देशांना ते एका गटात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव यांनी पाश्चिमात्य देशांवर गंभीर आरोप करतानाच भारतालादेखील इशारा देण्याचा प्रयत्न केलाय. पाश्चिमात्य देश हे भारतासोबत संबंध घनिष्ट करण्याचं निमित्त करत भारत-रशिया संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

पाश्चिमात्य देशांशी जवळीक वाढवल्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराच रशियानं या वक्तव्यातून दिलाय. रशियातील सरकारशी संबंधित थिंक टँक ‘रशियन इंटरनॅशनल अफेअर्स काऊन्सिल’च्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झालेल्या लावरोव यांनी हा इशारा दिलाय. रशिया आणि चीन वगळता बाकी जगातील सर्व देशांना ते एका गटात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

लावरोव पुढं म्हणाले, “रशिया आणि चीन हे अमेरिकेला कधीच शरण येणार नाहीत. भारतासोबत पाश्चिमात्य देशांचे सुधारत चाललेले संबंध हे त्यांच्या कूटनितीचा भाग आहेत. चीनवर वर्चस्व ठेवण्यासाठी भारताचा उपयोग केला जात आहे. चीनविरोधात आपली शक्ती वाढवण्यासाठी पाश्चिमात्य देश भारतासोबत सलोख्याचे संबंध बनवत आहेत.”

२०१७ मध्ये अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या ‘क्वाड’ गटाची स्थापना करण्यात आली होती. चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. मात्र अमेरिकेच्या म्हणण्यानुसार ही काही चार देशांची युती नव्हे. परस्पर संबंध, सलोखा आणि व्यवहार वाढवण्यासाठी केलेला गट आहे.

पाश्चिमात्य देशांचा भारत-रशिया संबंध कमजोर कऱण्याचा प्रयत्न हाणून पाडायला हवा, असं लावरोव यांनी म्हटलंय.