Russia crash: plane crashes shortly after takeoff; Death of 16 passengers

रशियातील तातारस्तान येथे रविवारी झालेल्या विमान अपघातात 16 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी झाले(Russian plane crashes in Tatarstan). 7 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमानात 21 पॅराशूट डायवर्ससह 23 जण होते.

    मॉस्को : रशियातील तातारस्तान येथे रविवारी झालेल्या विमान अपघातात 16 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी झाले(Russian plane crashes in Tatarstan). 7 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमानात 21 पॅराशूट डायवर्ससह 23 जण होते.

    आपातकालीन सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 2 वैमानिकांचाही समावेश आहे. ज्या सात जणांना विमानाच्या मलब्याखालून काढण्यात आले, ते गंभीर जखमी आहेत.

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण भरताच हा अपघात झाला. टेकऑफ घेताच काही वेळाने विमान जमिनीवर कोसळले. लेट एल-410 टर्बोलेट हे अपघातग्रस्त विमान फार जुने होते.

    दोन इंजिन असलेले हे विमान कमी पल्ल्याची वाहतूक करणारे होते. हे ट्रान्सपोर्ट विमान चेक रिपब्लिकमध्ये 1970 च्या सुरुवातीस बनविले गेले होते.