रशिया प्रथम ‘या’ देशाला पुरवणार कोरोनावरील लस

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बेलारुसे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना लसीची पहिली तुकडी पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. या बाबत दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचे समजते आहे. बेलारुसमधील जनता सरकारविरोधात आंदोलने करत आहे. तसेच या महिन्यात बेलारुमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला.

रशिया : जगभरात कोरोनाने थैंमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग जगभर पसरला आहे. कोरोनावर जगातील सर्वच देश लस शोधत आहे. परंतु कोरोनावर लस शोधणारा पहिलाच देश रशिया (Russia) आहे. रशियाने कोरोनावर लस (corona vaccine) काढल्याचा दावा केला आहे. रशियाकडून कोरोना लस घेणारा बेलारुस हा पहिला देश आहे. रशिया आपली लस बेलारुसला पुरवणार आहे त्यामुळे बेलारुस हा रशियाची लस घेणारा पहिलाच देश आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बेलारुसे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना लसीची पहिली तुकडी पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. या बाबत दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचे समजते आहे. बेलारुसमधील जनता सरकारविरोधात आंदोलने करत आहे. तसेच या महिन्यात बेलारुमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला.

दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या संवादादरम्यान व्लादिमीर पुतीन यांनी लुकाशेन्को यांच्यासमवेत देशातील परिस्थितीविषयी चर्च केली. आणि कोरोना लस पाठवण्याबाबत चर्चा झाली. तसेच कोरोनावरील लस बेलारुस प्रथम स्वयंसेवकांना देणार असल्याचे समजते आहे. रशिया या लसीची तिसरी चाचणी करत आहे. रशियाने ३ चाचणीच्या आधीच लस प्रभावशाली असल्याचा दावा केला आहे. बेलारुसमध्ये कोरोनाची प्रकरणे ७० हजाराहून अधिक आहेत. जगातील सर्वच देश कोरोनावरील लसीचा प्रतीक्षेत आहेत