russian doing bhangra

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रशियन तरुण- तरुणी भांगडा(Russian Dancers Doing Bhangra) करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ(Viral Video) सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

    पंजाबी गाणी(Punjabi Song) आणि पंजाबी भांगडा(Bhangra) फक्त भारतातच नव्हे तर अन्य देशांमध्येही प्रसिद्ध आहे. अनेकदा विदेशी लोकही भांगड्यावर ठुमके लगावताना आपण बघितले असतील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रशियन तरुण- तरुणी भांगडा(Russian Dancers Doing Bhangra) करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ(Viral Video) सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

    लोक रशियन डान्सर्सची खूप स्तुती करत आहेत. हा डान्सचा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, रशियन आणि भांगडा एकत्र तुम्ही पाहू शकता. मुंडिया तू बचके रही या गाणे सुरु आहे.त्यावर रशियन डान्सर्स नाचत आहेत. डान्स करतानाचे त्यांचे हावभाव खूपच सुंदर आहेत.

    लोक या व्हिडिओवर अनेक कमेंट करुन या तरुण -तरुणींचे खूप कौतुक करत आहेत.