सीरियात भूसुरुंग स्फोटात रशियन मेजरचा मृत्यू

स्फोटात जखमी जनरलचा मृत्यू झाला. तथापि, मंत्रालयाने त्यांची ओळख जाहीर केली नाही.

मॉस्को : सीरियामध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात रशियन मेजर जनरल ठार झाला आणि दोन इतर लष्करी जवान जखमी झाले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की हा हल्ला सिरियाच्या आग्नेय पूर्वेतील ‘दिर एज जोर’ प्रांतामध्ये झाला जेव्हा रशियन लष्कराच्या ताफ्याचे सैनिक “मानवतावादी” मोहिमेनंतर सैन्य तळावर परत येत होते. स्फोटात जखमी जनरलचा मृत्यू झाला. तथापि, मंत्रालयाने त्यांची ओळख जाहीर केली नाही.