vaccine corona virus

रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही कोरोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित (Russia's Corona vaccine is safe) असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात सुरक्षित असल्याचे आढळले.

कोरोनाचा प्रादुर्भाव ( corona virus) संपूर्ण जगभरात वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देश कोरोनावर मात करण्यासाठी विविध प्रकारची लस तयार करत आहे. रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही कोरोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित (Russia’s Corona vaccine is safe) असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात सुरक्षित असल्याचे आढळले.

स्पुटनिक व्ही लस टोचल्यानंतर ४२ दिवसांनंतरही कोणतेही अन्य गंभीर परिणाम जाणवले नाहीत. त्याचप्रमाणे ही लस २१ दिवसांत शरीरामध्ये अॅण्टिबॉडी तयार करण्यास सक्षम आहे. अनेक अभ्यासातून ही लस सुरक्षित असल्याचे समोर आले होते. सध्या कोविड-१९ची लस वेक्टर्सचा वापर करून एसएआरसी-सीओव्ही -२ च्या स्पाइक प्रोटिनला लक्ष्य करतात.

रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे समोर आले होते. रशियाची चाचणी दोन रुग्णालयांमध्ये करण्यात आली त्यामध्ये १८ ते ६० वर्षे वयापर्यंतच्या निरोगी व्यक्तींचा समावेश होता. अमेरिकेसह अन्य देशांनी रशियावरील लसीला मंजुरी दिल्यावर आक्षेप घेतला होता.परंतु रशियाने ही लस सुरक्षित असल्याचं सांगितले होते.