samila hasan president of tanzania

जॉन मेगुफूली(john megufuli) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी समिया हसन(samia hasan) यांची वर्णी लागणार आहे.  टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समिया सुलूहू हसन(first woman president of tanzania) या सध्याच्या काळातील आफ्रिकेतील एकमेव महिला राष्ट्रप्रमुख ठरतील.

    टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष(tanzania president) जॉन मेगुफूली यांचे बुधवारी निधन झाले. त्यामुळे सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या समिया सुलूहू हसन या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. सुलूहू हसन यांच्या रूपाने प्रथमच एखादी महिला टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडली जाणार आहे.

    समिया हसन या २०१५ मध्ये पहिल्यांदा उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समोर आल्या होत्या. त्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून त्याच या पदावर आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही जॉन मेगुफूली-समिया हसन जोडीने पुन्हा विजय मिळवला होता. पण आता जॉन मेगुफूली यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी समिया हसन यांची वर्णी लागणार आहे.  टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समिया सुलूहू हसन या सध्याच्या काळातील आफ्रिकेतील एकमेव महिला राष्ट्रप्रमुख ठरतील.