Microsoft CEO Satya Nadella

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने(Microsoft Corporation) सत्या नाडेला(Satya Nadella Is New Chairman OF MicroSoft) यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

    मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने(Microsoft Corporation) सत्या नाडेला(Satya Nadella Is New Chairman OF MicroSoft) यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भारतीय वंशाचे नाडेला गेली ७ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. नाडेला जॉन थॉमसन यांची जागा घेणार आहेत. तर जॉन थॉमसन पुन्हा एकदा लीड इंडिपेंडेंट डायरेक्टरच्या भूमिकेत परतणार आहे.

    नाडेला यांची २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक करण्यात आली होती. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटांतून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले. ऑफिस सॉफ्टवेअर फ्रँचायझीला पुनरुज्जीवित करताना क्लाउड कंप्यूटिंग, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

    नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सात पटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली. नाडेला हे कंपनीचे तिसरे अध्यक्ष होतील. यापूर्वी बिल गेट्स आणि थॉमसन कंपनीचे अध्यक्ष होते.

    त्यांचं व्यवसायाबद्दलचं सखोल ज्ञान योग्य धोरणात्मक संधी स्वीकारण्यासाठी आणि महत्त्वाच्या जोखीम ओळखण्यासाठी कंपनीला उपयोग होईल, असं मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.