सौदी अरेबियाचा चीनला मोठा झटका, १० अरब डॉलरचा करार केला रद्द

सौदी अरेबियाने चीनशी केलेल्या १०अरब डॉलरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय चलनात ही रक्कम ७५ हजार कोटी रुपये होते. या करारात आरामको कंपनी चीनमध्ये एक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स काँप्लेक्स बनवणार होती.

सोदी अरेबिया : चीनची सर्व देशांशी वैर वाढत आहे. त्यामुळे भविष्यात चीनच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर जगातील सर्व देशांचे चीनवर लक्ष केंद्रीत झाले आहे. भारताने चीनशी केलेले करार रद्द केल्यानंतर अनेक देशांनीही चीनसोबत व्यवसाय न करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियानेही चीनला मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाच्या आरामको तेल कंपनीने चीनसोबत केलेला १० अरब डॉलरचा करार रद्द करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे चीनला मोठा झटका बसणार आहे.

सौदी अरेबियाने चीनशी केलेल्या १०अरब डॉलरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय चलनात ही रक्कम ७५ हजार कोटी रुपये होते. या करारात आरामको कंपनी चीनमध्ये एक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लॅक्स बनवणार होती.

जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या महामारिमुळे तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. तेलाच्या किंमती घट झाल्याने तेल कंपनीला मोठा घाटा होत आहे. तसेच भविष्यातील उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन आराम्को कंपनीने हा करार रद्द करण्यात आल्याचे कंपनीकडून माहिती मिळाली आहे.

या काराराच्या रद्द होण्यामुळे चीनला मोठे नुकसान होणार आहे. करारानंतर सौदी अरेबिया चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार होती. त्यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे. तसेच सध्या हा करार मागे टाकण्यात आला आहे.