saudi arabia

रियाध: सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने जोरदार दणका दिला आहे. सौदीने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून वगळले आहे.(saudi arabia deleted pok from pakistan`s map) पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

रियाध: सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने जोरदार दणका दिला आहे. सौदीने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून वगळले आहे.(saudi arabia deleted pok from pakistan`s map) पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली. सौदी अरेबियाने भारतासाठी दिवाळी गिफ्ट, गिलगिट-बाल्टिस्तान आणि काश्मीर पाकिस्तानच्या नकाशातून काढून टाकले, मिर्झा यांनी सौदीने प्रसिद्ध केलेल्या नकाशाचा फोटो पोस्ट करीत म्हटले आहे. विशेष म्हणजे या पोस्टनंतर मिर्झा यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१-२२ नोव्हेंबरला सौदीच्या अध्यक्षतेखाली जी-२० समिट होणार आहे. या पार्श्वभूमीवर सौदी-अरेबियाने २० रियालची नवी नोट प्रसिद्ध केली आहे. या नोटेवर सौदीसह शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा नकाशा छापला आहे. मात्र, यातून गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओके हा भाग वगळला आहे.

दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तथाकथीत गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेतील विधानसभा निवडणुकीचा अहवालवर परराष्ट्र मंत्रालायने सप्टेंबर महिन्यांत कडक आक्षेप घेतला होता. तसेच पाकिस्तान सरकारची कानउघडणी करण्यासाठी आंदोलनही केले होते. जम्मू आणि काश्मीर, लडाख तसेच कथित गिलगिट-बाल्टिस्तान हे भारताचे अंतर्गत भाग असल्याचे ठणकावून सांगितले होते.

इम्रान खान सरकारने यापूर्वी पाकिस्तानचा नवा नकाशा प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी जुनागड येथील भारताचा भूभाग, सर खाडी आणि गुजरातमधील मनवदर तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख या भागावर दावा केला होता. दरम्यान, भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारला विशेष अधिकार मिळाल्याने सौदी अरेबियाने हा नकाशा प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात येत आहे.