‘या’ देशातील महिलांसोबत लग्न करण्यासाठी पुरुषांना घ्यावी लागणार सरकारची परवानगी तर घटस्फोटासाठी विवाहित महिलांना द्यावे लागणार पुरावे

सौदीच्या ज्या पुरुषांना आता परदेशी महिलांशी विवाह करायचा असेल त्यांना आधी सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसा रीतसर अर्ज सरकारी कार्यालयांत सादर करावा लागेल, जो अनेक टप्प्यांतून आणि अनेक प्रक्रियांतून जाईल. महिलांना घटस्फोट घेणेही तुलनेने अतिशय कठीण आहे. संबंधित विवाहित महिलेला घटस्फोटासाठी एकतर तिच्या नवऱ्याची संमती हवी किंवा नवरा त्रास देत असल्याचा, मारहाण करीत असल्याचा पुरावा त्या महिलेकडे असणे आवश्यक आहे.

    लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे म्हटले जाते. आधुनिक जगातही जोडीदार निवडीचा हक्क ही व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडलेली  स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाला सज्ञान जोडीदार निवडण्याचा व त्याच्याशी लग्न करण्याचा हक्क असावा अशी आधुनिक विचारसरणी आहे. यासगळ्या गोष्टीं करता असताना या अनेकदा कुटुंबियांचा विचार घेतला जातो. विवाहाबाबत असलेल्या या कौटुंबिक आणि  सामाजिक बेड्या तोडने सहज शक्य नसते. पण विवाहासारख्या आयुष्यातील अत्यंत खासगी असलेल्या गोष्टींमध्ये थेट सरकारने सहभाग
    घेणे थोडे आश्चर्यच आहे. पण हे सत्य आहे.

    सौदी अरेबिया या देशातील सरकारनेच आता आपल्या देशातील पुरुषांसाठी त्यांनी कोणत्या महिलेशी लग्न करावं, किंबहुना करू नये याबाबतचे चक्क शासकीय नियम घालून दिले आहेत. यानियमानुसार त्यामुळे सौदी अरेबियातील पुरुष पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार येथील मुलींशी विवाह करू शकणार नाहीत. सौदीच्या पुरुषांना सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक जोखडाबरोबरच सरकारी नियमांचं जोखडही आता बाळगावं लागणार आहे. आपल्या देशातील पुरुषांचे आंतरराष्ट्रीय विवाह होऊ नयेत, असं खुद्द सौदी अरेबिया सरकारलाच वाटते

    तसेच सौदी अरेबियातील महिलांना घटस्फोट घेणेही तुलनेने अतिशय कठीण आहे. संबंधित विवाहित महिलेला घटस्फोटासाठी एकतर तिच्या नवऱ्याची संमती हवी किंवा नवरा त्रास देत असल्याचा, मारहाण करीत असल्याचा पुरावा त्या महिलेकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांनी दिलेल्या घटस्फोटाचं प्रमाण सौदीत खूपच जास्त, असून ते जवळपास पन्नास टक्के आहे.

    सौदी अरेबियातील पुरुषांना परदेशी महिलांशी विवाह करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सौदी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ‘मक्का डेली’ आणि ‘डॉन’ या वृत्तपत्रांच्या म्हणण्यानुसार, मक्केचे पोलीस महानिर्देशक मेजर जनरल असफ अल-कुरैशी यांच्या हवाल्याने एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे परदेशी महिलांशी, विशेषत: पाकिस्तान, बांगलादेश, चाड आणि म्यानमार या देशांतील महिलांशी विवाहविषयक नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत.

    सौदीच्या ज्या पुरुषांना आता परदेशी महिलांशी विवाह करायचा असेल त्यांना आधी सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसा रीतसर अर्ज सरकारी कार्यालयांत सादर करावा लागेल, जो अनेक टप्प्यांतून आणि अनेक प्रक्रियांतून जाईल. ज्या पुरुषांचा घटस्फोट झाला आहे अशा पुरुषांना परदेशी महिलेशी पुन्हा विवाह करायचा असेल, तर घटस्फोटानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत त्याला तसा अर्जदेखील करता येणार नाही. अर्जदाराचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक असावे आणि स्थानिक महापौरांच्या स्वाक्षरीसहित आपली ओळख दाखवणारी सर्व कागदपत्रे त्याला सादर करावी लागतील. याशिवाय या कागदपत्रांसोबत सरकारने दिलेल्या कौटुंबिक कार्डाची प्रत जोडणेदेखील बंधनकारक असेल.

    अर्जदार जर आधीच विवाहित असेल, तर नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे प्रमाणपत्र त्याला सादर करावे लागेल. ज्यात एकतर पत्नी अक्षम असल्याचे किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे किंवा ती कधीच मूल जन्माला घालू शकण्यास समर्थ नसल्याबाबतचा उल्लेख अत्यावश्यक असतील. सौदी अरेबियात आजही बहुतांश विवाह हे ‘अरेंज्ड मॅरेज’ असतात. मुख्यत: ओळखीच्या वर्तुळातच मुला-मुलींचे विवाह लावले जातात. नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी यांचे नातेवाईक एकमेकांना ओळखत असतील तरच शक्यतो हे विवाह होतात. त्यातही विवाहाच्या बाबतीत कुटुंबातील ज्येष्ठ महिलांचा विचार महत्त्वाचा मानला जातोे. त्यांच्या सल्ल्यानेच हे विवाह पार पाडले जातात.