Saw people hanging from a flying plane in Afghanistan; The condition inside the plane is so dangerous

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये विमानाच्या आतील कंडीशन तर एकमदम डेंजर दिसत आहे. एखाद्या ट्रकमध्ये बसल्याप्रमाणे शेकडो लोक विमानात दाटीवाटीने बसलेले दिसत आहेत. विमानात इतकी गर्दी दिसत आहे की मुंगी शिरायलाही जागा नाही. हे विमान सैन्य दलाचे असल्याचे समजते.

    काबूल : तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानात सत्तांतर घडवून आणत देशाची सत्ता काबीज केली आहे. काबुल विमानतळावरुन अफगाण नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर तीन नागरिक विमानात गर्दी असल्यानं जागा मिळाली नाही आणि विमानातून खाली पडले(Trying to catch a running plane).अफगाणिस्तानातील धावत्या विमानाला लटकेल्या नागरीकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विमानाच्या आतील गर्दीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

    व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये विमानाच्या आतील कंडीशन तर एकमदम डेंजर दिसत आहे. एखाद्या ट्रकमध्ये बसल्याप्रमाणे शेकडो लोक विमानात दाटीवाटीने बसलेले दिसत आहेत. विमानात इतकी गर्दी दिसत आहे की मुंगी शिरायलाही जागा नाही. हे विमान सैन्य दलाचे असल्याचे समजते.

    अफगाणिस्तान विमातळावरील काही व्हिडिओ सोमवारी रात्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओत तिघेजण विमानातून पडल्याचे दिसत आहे. सर्वच जण विमानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. विमानाने टेक ऑफ केल्यानंतरही अनेक जन विमाना मागे धावत विमान पकडण्याचा प्रयत्न करत होते. यापैकरी काही जण विमानांच्या पायऱ्यांवर लटकले तर काही जणांनी विमानाच्या पंख्याचा आधार घेतला. मात्र, विमानाने उड्डाण केल्यानंतर की तीघेजण खाली पडले. तिघेही एका इमारतीवर पडले. या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.