विद्यार्थिनींना तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी शाळा संस्थापकांनी जाळले विद्यार्थिनींचे रेकॉर्ड

    काबूल : अफगाणिस्तानात मुलीच्या बोर्डिंग शाळेच्या संस्थापकांनी विद्यार्थिनींना तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी त्यांचे सर्व रेकॉर्ड जाळून टाकले. अफगाणिस्तानमधील ऑल गर्ल्स बोर्डिग शाळेचा संस्थापक म्हणून मी माझ्या सर्व विद्यार्थिनीचे रेकॉर्ड जाळून टाकत आहे. ही कागदपत्रे नष्ट करण्यासाठी नव्हे तर आमच्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जाळली आहेत. ज्या विद्यार्थिनींचे रेकॉर्ड जाळत आहोत त्यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षेची हमी देण्यासाठी मी ही माहिती देत आहे, असे ट्वीट शाळेच्या संस्थापक शबाना बसीज-रसीख यांनी केले आहे.

    यावेळी त्यांना कागदपत्रे जाळतानाचा व्हीडिओदेखील शेअर केला आहे. तालिबानच्या राजवटीमधील आपला अनुभवदेखील यावेळी त्यांनी सांगितला. बंडखोरांनी त्यांचे अस्तित्व मिटवण्यासाठी सर्व महिला विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड जाळले होते. पण 2002 मध्ये तालिबानने माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील महिलांना नव्याने संधी मिळाली. शाळेमध्ये जागा मिळालेल्या मुलींमध्ये त्यांचाही समावेश होता.