युरेका ! शास्त्रज्ञांनी केलंय लय भारी काम, चीनमधील वुहानमध्ये कोरोना विषाणू तयार झाल्याचा शोधला मोठा पुरावा

ब्रिटिश आणि नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनीही आता वुहानमध्येच(Wuhan) कोरोना विषाणू तयार झाल्याचा दावा केला आहे आणि याबाबत पुरावा दिला आहे.

    जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची उत्पत्ती कशी झाली, याचा शोध घेत आहे. बहुतेकांनी कोरोना हा चीनमधूनचा (China)  वुहान लॅबमध्येच (Corona Virus in china wuhan lab) तयार करण्यात आला, अशी शक्यता व्यक्त केली आहे.  ब्रिटिश आणि नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनीही आता वुहानमध्येच(Wuhan) कोरोना विषाणू तयार झाल्याचा दावा केला आहे आणि याबाबत पुरावा दिला आहे.

    ब्रिटिश प्राध्यापक एंगस डल्गलिश आणि नॉर्वेतील शास्त्रज्ञ डॉ. सोरेनसन यांनी कोरोना व्हायरस चाीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आला असा दावा केला आहे. कोरोना व्हायरसच्या सॅम्पलमध्ये युनिक फिंगरप्रिंट मिळाले आहेत, जे लॅबमध्ये व्हायरसशी छेडछाड केल्यानंतरच शक्य आहेत. असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

    या दोन्ही शास्त्रज्ञांनी रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार चिनी शास्त्रज्ञांनी व्हायरसला वुहान लॅबमध्ये गेन ऑफ फंक्शन प्रोजेक्टवर काम करत बनवलं आहे. गेन ऑफ फंक्शन अमेरिकेत अस्थायी स्वरूपात बॅन आहे. यामध्ये नैसर्गिक निर्मित व्हायरसला अधिक संसर्गजन्य बनवण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची निर्मिती केली जाते. जेणेकरून माणसांवर त्याचा जास्त परिणाम होईल.

    संशोधनानुसार, चिनी शास्त्रज्ञांनी गुहेतील वटवाटळांमधील नैसर्गिक कोरोना व्हायरसचा आधार घेऊन त्याला एक नवीन स्पाइक जोडला. परिणामी अधिक संसर्गजन्य आणि जीवघेणा कोविड -१९ विषाणू तयार झाला. कोविड-१९ मध्ये नैसर्गिक कोरोना व्हायरसचे कोणतेही जुने प्रमाणिक अंश मिळत नाहीत. सोबतच लॅबमध्ये व्हायरससोबत छेडछाड केल्याची माहिती होऊ नये, यासाठी रिव्हर्स इंजिनीअरिंग केली आहे.

    प्रा. एंगस डल्गलिश यांनी सांगितलं, आम्हाला वाटतं रेट्रो इंजिनीअरिंगमुळे व्हायरस तयार करण्यात आला होता. त्यानंतर त्याला बदलण्यात आलं आणि त्याला असं सिक्वेंस देण्यात आलं, जे कित्येक वर्षांपूर्वीच्या स्थितती होता. वुहान लॅबमधील पुरावे नष्ट केल्याबाबत शास्त्रज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या शास्त्रज्ञांना याची माहिती द्यायची होती ते गायब झाले किंवा आतापर्यंत काही बोलले नाही आहेत.
    याआधी जानेवारी २०२१ मध्ये वुहानमध्ये गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने आपल्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरस हा नैसर्गिकरित्या निर्माण झालेला आहे, असंच म्हटलं होतं.बायडेन यांनी व्हायरसची उत्पत्ती कशी झाली हे शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत.