नरकाच्या खड्ड्यात उतरले वैज्ञानिक ; येमेन येथील रहस्यमयी खड्ड्याचे उलगडले रहस्य

येमेन येथील स्थानिक लोक या रहस्यमय खड्ड्याविषयी नुसते बोलायला सुद्धा तयार नसतात. विशाल वाळवंटात हा खड्डा आहे.या खड्यात ओमानच्या जर्मन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या भूगर्भ शास्त्र विभागाचे प्रोफेसर मोहम्मद अल किंदी यांच्यासह आठ वैज्ञानिकांची टीम उतरली आहे. या खड्ड्यात नक्की काय आहे याचा शोध त्यांनी घेतला.

    या जगात नरकाचा खड्डा आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर आम्हालाही याबाबत खात्री नाही.. मात्र येमेन देशातील बरहून मधील एक महाप्रचंड विवर म्हणजे नरकाची विहीर आहे. जी जगभर ‘ वेल ऑफ हेल’ या नावाने प्रसिद्ध आहे. या खड्ड्यात सैतानांना कैद केले जाते आणि या अतिखोल खड्ड्यात जिन, भुते राहतात, असे किस्से सांगितले जातात. अनेक वर्षांपासून या खड्ड्यात काय असावे याचे गुढ आहे.मात्र हे गूढ आता लवकरच उलगडणार आहे, कारण या विहिरीत वैज्ञानिक उतरले आहेत.

    काय आहे खड्ड्यात?
    येमेन येथील स्थानिक लोक या रहस्यमय खड्ड्याविषयी नुसते बोलायला सुद्धा तयार नसतात. विशाल वाळवंटात हा खड्डा आहे.या खड्यात ओमानच्या जर्मन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या भूगर्भ शास्त्र विभागाचे प्रोफेसर मोहम्मद अल किंदी यांच्यासह आठ वैज्ञानिकांची टीम उतरली आहे. या खड्ड्यात नक्की काय आहे याचा शोध त्यांनी घेतला. ओमान केव्ह एक्स्प्लोरेशन टीम आत उतरली तेव्हा त्यांना साप, काही मेलेले प्राणी अवशेष आणि पाण्यामुळे तयार होणारे, गुहेत बनणारे मोती मिळाले असे समजते. हा खड्डा ३० मीटर रुंद आणि १०० ते २५० मीटर खोल असावा असा अंदाज आहे.

    महारा जिओलॉजीकल सर्व्हेचे महासंचालक सालाह म्हणाले, खड्ड्याच्या तळापर्यंत प्रकाश पोहोचत नाही. आत मध्ये ऑक्सिजन प्रमाण कमी आहे. त्यांना ५० मीटर खोलीपर्यंत जाता आले होते. आत विशिष्ट वास आहे.आत साप आहेत पण तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तर ते इजा करत नाहीत. आत मध्ये काहीही अनैसर्गिक प्रकार नाही. भिंतीवर अद्भूत रचना तयार झालेल्या आहेत आणि राखाडी, हिरव्या रंगाचे मोती दिसत आहेत.हा खड्डा लाखो वर्षापूर्वीचा असून त्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.