Antibodies in patients

अँटीबॉडी ( Antibody )  ही श्वसन प्रणालीच्या आतील अंगांना घेरून असलेल्या पापुद्रयावर एसीई २ रिसेप्टवर विषाणूला थांबू देत नाही. असे नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात म्हटले आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोनावरील अचूक उपचारासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु मानवी शरीरात आढळणारी आणि कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी शोधून काढण्यात आता वैज्ञानिकांना मोठे यश ( Scientists have been successful in finding antibodies) आले आहे.

अँटीबॉडी ( Antibody )  ही श्वसन प्रणालीच्या आतील अंगांना घेरून असलेल्या पापुद्रयावर एसीई २ रिसेप्टवर विषाणूला थांबू देत नाही. असे नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात म्हटले आहे. १६ वर्षांपूर्वी संशोधकांनी आयजीजी मोनोक्लोनल अँटीबॉडी (Monoclonal antibody)  शोधली होती. यानंतर जुना सार्स कार्यक्रम पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रिया संशोधकांनी सुरू केली.

मोनोक्लोनल अँटीबॉडी ही एक अशी अँटीबॉडी आहे, जी समान इम्यून सेल तयार करते. तसेच या सर्व पेशी एका विशिष्ट प्रकारच्या मुळ पेशींच्या क्लोन असतात. कोरोना विषाणूमध्ये ९० टक्के साधर्म्य असले तरी, मोनोक्लोनल अँटीबॉडीने सध्याच्या कोरोना विषाणूशी संबंध प्रस्थापित करण्याची कुठलीही क्षमता प्रदर्शित केलेली नाही. असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. जागतिक महामारी असलेल्या कोरोनाची लस प्रामाणिकपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान डब्लूएचओने केले आहे.