serial rapist taxi driver punishment for 384 years
अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या टॅक्सीचालकाला ३८४ वर्षांची शिक्षा

आफ्रिका खंडातील जाम्बिया या देशात फेलिक्स नावाच्या तरुणाला ३८४ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फेलिक्स टॅक्सी चालक म्हणून काम करतो. त्याने गेल्या वर्षी अनेक महिलांवर बलात्कार केल्याचं उघड झालं. त्यातील काही त्याच्या टॅक्सीत बसून प्रवास करणाऱ्या होत्या.

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे सध्या देशभरात संतापाची लाट पसरली आहे. ठिकठिकाणी या घटनांना निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, जाम्बियामधील एका निकालामुळे हा प्रश्न जगात अनेक ठिकाणची समस्या बनल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आफ्रिका खंडातील जाम्बिया या देशात फेलिक्स नावाच्या तरुणाला ३८४ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फेलिक्स टॅक्सी चालक म्हणून काम करतो. त्याने गेल्या वर्षी अनेक महिलांवर बलात्कार केल्याचं उघड झालं. त्यातील काही त्याच्या टॅक्सीत बसून प्रवास करणाऱ्या होत्या. तो त्यांना निर्जन स्थळी घेऊन जात असे. त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार करत असे आणि त्यानंतर त्यांच्याकडील पैसे आणि अन्य ऐवजही काढून घेत असे.

त्याचे हे गुन्हे जेव्हा उघड झाले, तेव्हा त्याने या महिलांवरच आरोप केले. आपण या महिलांवर अत्याचार केले नसून त्या शरीरविक्रय करणाऱ्या होत्या आणि आपल्याकडून पैसे घेऊन उलट त्यांनी आपल्यालाच फसवलं, असा कांगावा त्याने केला. मात्र, ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला शिक्षा ठोठावण्यात आली.

कोर्टाने त्याला लुटमार, बलात्कार, हिंसा अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तब्बल ३८४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. पण, तो फक्त ४० वर्षच शिक्षा भोगेल. कारण, त्याला त्या सगळ्या शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. फेलिक्ससारख्या मनोवृत्तीचे लोक समाजासाठी घातक असल्याची टिपण्णी कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावताना केली आहे.