सीरमची ब्रिटनसोबत हातमिळवणी; लसनिर्मितीसाठी २५०० कोटींची गुंतवणूक

सीरम इन्स्टिट्यूट व भारत सरकारमध्ये कलगीतुरा रंगल्यानंतर जगातील प्रमुख लस उत्पादक असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी आता ब्रिटनसोबत हातमिळवणी केली असून, तिथे लस उत्पादन सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी २५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबतची माहिती दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जॉन्सन यांची व्हर्चुअल बैठक पार पडणार आहे. त्यापूर्वीच जॉन्सन यांनी ही घोषणा केली.

  लंडन : सीरम इन्स्टिट्यूट व भारत सरकारमध्ये कलगीतुरा रंगल्यानंतर जगातील प्रमुख लस उत्पादक असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी आता ब्रिटनसोबत हातमिळवणी केली असून, तिथे लस उत्पादन सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी २५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबतची माहिती दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जॉन्सन यांची व्हर्चुअल बैठक पार पडणार आहे. त्यापूर्वीच जॉन्सन यांनी ही घोषणा केली.

  पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प ३४६०कोटी रुपयांचा असून यामध्ये क्लिनिकल चाचणी, संशोधन आणि लस निर्मितीचा समावेश आहे. याच महिन्यात भारतात लसीकराचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी लशींअभावी लसीकरण मोहिम ठप्प झाली आहे.जानेवारीत कोरोनाबाधितांची संख्या घटताच सरकारचे दुर्लक्ष झाले आणि लशींची ऑर्डर मिळणेच बंद झाल्याने लशींची उत्पादन क्षमता वाढविण्यात आली नव्हती असा खुलासा सीरमचे सीईओ अदर पुनवाला यांनी केली होती. दुसरीकडे, सरकारने मात्र लशींची ऑर्डर दिली परंतु कंपन्याच पुरवठा करीत नसल्याचा दावा केला होता.

  १० कोटी डोज निर्मितीचे लक्ष्य

  सिरम इन्स्टिट्यूटकडून दर महिन्याला करोना लशीचे सहा ते सात कोटी डोस उत्पादित करण्यात येतात. सध्या कंपनीकडून जुलै महिन्यापर्यंत १० कोटी डोस निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस कंपनी आहे. सिरमकडून विविध आजरांवरील लशीचे उत्पादन केले जाते. ऑक्सफर्ड विद्यापीठ- एस्ट्राजेनकाच्या करोना लशीचे उत्पादन सिरमकडून करण्यात येत आहे.

  सरकारचे स्पष्टीकरण

  • गेल्या महिन्यात १६० मिलियन लशींची ऑर्डर दिली व तीन महिन्यात पुरवठा होणार होता.
  • सरकारने २८ एप्रिल रोजी ११० मिलियन कोव्हिशिल्ड तर ५० मिलियन कोव्हॅक्सीनची ऑर्डर दिली होती.
  • याच दिवशी केंद्र सरकारने सीरमला १७३२ कोटी तर भारत बायोटेकला  ७८७ कोटींची रक्कमही देय केली होती.
  • ऑर्डर आणि रक्कम दिल्यानंतरही कंपन्या पुरवठाच करीत नसल्याचा आरोप.
  • सीरमने दिलेल्या ऑर्डरपैकी  ८७.४ मिलियन डोज तर भारत बायोटेकने ८.८१ मिलियन डोजचा पुरवठा केला आहे.