The devastation of Taliban atrocities in Afghanistan; What to do with stranded Indians? Five questions before the Modi government

तालिबानच्या तावडीतून सुटका झालेले नागरिक सुटकेचा नि:श्वास घेत असले तरी त्यांच्यात अद्यापही दहशत आहे. तथापि, आपला देश उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून अफगाणिस्तानमधील शिख खासदार नरेंदर सिंग खालसा यांना अश्रू अनावर झाले. फगाणिस्तानात हिंदू आणि शिख बांधव चिंतेत आहेत. जेवढेही भारतीय आहेत, त्या सर्वांना लवकरात लवकर मायदेशात आणावे, अशी विनंती त्यांनी सरकारला केली. काबुल विमानतळाच्या प्रत्येक गेटवर 5 ते 6 हजार नागरिक उभे आहेत. त्यात तालिबानीही घुसले आहेत. यामुळे दहशतवादी कोण आणि नागरिक कोणते हेच कळत नाही असे सांगत गेल्या 20 वर्षांत जे काही उभे केले होते ते सर्व संपले, असे उद्विग्न अवस्थेत खालसा म्हणाले.

  काबूल : तालिबानने काबूल शहरावर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तान नागरिक देश सोडण्यासाठी विमानतावर गर्दी करत आहेत. तालिबानीपासून जीवाला धोका असल्याने अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी असल्याने परिस्थिती तणावपूर्ण स्थिती असून रविवारी चेंगराचेंगरीची घटना घडली. विमानतळाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटिश सैन्यदलाने दिली. येथील स्थिती आव्हानात्मक असून स्थिती हाताळण्यासह लोकांच्या सुरक्षेचाही काळजी घेतली जात आहे, असेही सैन्यदलाने स्पष्ट केले.

  अफगाणिस्तान सोडणाऱ्यांनी काबूल विमानतळावर एकच गर्दी केली असून दुसरीकडे तालिबान मात्र अफगाणी नागरिकांना रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विमातनळावर येणाऱ्या मार्गावर तालिबानचा कडक पहाराही आहे व जाणाऱ्या येणाऱ्याची कसून तपासणी केली जात आहे.

  पंजशीरनजक बगलान प्रांतातील अंदराब जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री मोठ्या संख्येत तालिबानी दहशतवादी दाखल झाले. येथे तालिबानविरोधात लढत असलेल्या हबंडखोरांनी काही दिवसांपूर्वी माघार घेत पर्वतांचा आश्रय घेतला होता. परंतु रविवारी सकाळी त्यांनी पर्वतांवरूनच तालिबानी दहशतवाद्यांवर हल्ले सुरू केले.

  काबूलहून भारतीयांची सुरक्षित सुटका करण्यासाठी भारतातर्फे प्रयत्न सुरू आहे. रविवारी तीन विमानांद्वारे 390 नागरिक भारतात परतले. यात 329 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. वायुदलाच्या सी-17 विमानाने 168 जण देशात परतले. यात 107 भारतीय आणि 23 अफगाणी शीख व हिंदूंचा समावेश आहे. हे विमान गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावर पोहोचल होते. यापूर्वी एअर इंडियाच्या विमानाद्वारे 87 भारतीय आणि 2 नेपाळी नागरिकांना देशात आणण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या विमानाद्वारे 135 जणांना देशात आणण्यात आले.

  भारताने एका अफगाणी बालक इखनूर सिंहला सुरक्षित काबूलहून भारतात आणले. या बालकाकडे पासपोर्ट नव्हता. मात्र भारताने विना पासपोर्ट त्याला देशात प्रवेश दिला आहे. कृपाल सिंह सोनी असे या बालकाचे नाव आहे.

  अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. काबूल विमानतळावरून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी रोज दोन विमानांना परवानगी देण्यात आली आहे. अमेरिका आणि उत्तर ट्रीटी ऑर्गनायझेशनने (नाटो) ही परवानगी दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. अफगाणिस्तानात अद्यापही 300 भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती सूत्राने दिली.