आलास्कामध्ये दोन विमानांच्या धडकेत ७ लोकांचा मृत्यू

अलास्का – आलास्कामध्ये शुक्रवारी एका मिडियर विनमान टक्करमध्ये ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. हे दोन विमाने छोट्या आकाराचे होते. एका विमानात पायलट आणि आलास्का देशाचे प्रतिनिधित्व करणारे राज्य प्रतिनिधी गॅरी नॉप्प होते. तर दुसऱ्या विमानात ४ लोक आणि पायलट होते. आलास्कामधील केनाई प्रायद्वीपातील शहस सोल्दोतना येथील विमानतळावर हा अपघात घडला आहे. 

या अपघातात ७ ही जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे. त्यातील एकाची प्रकृती नाजूक असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात झाल्यावर विमाने एका महामार्गावर पडला आहे. परंतु महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने आधीच बंद ठेवला होता. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. या घटनेत आलास्कामधील आमदार गॅरी नूप यांच्या मृत्यू झाला आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.