मेक्सिकोमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भूकंपशास्त्रज्ञ आणि रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण मेक्सिकोमधील अकापुल्कोमध्ये सुरुवातीला७.० तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. मेरिकन त्सुनामी चेतावणी प्रणालीचे म्हणणे आहे की, मेक्सिकोच्या ग्युरेरोमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर त्सुनामीचा धोका आहे.

    दक्षिण मेक्सिकोमध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के बसले आहेत.७. ४ रिश्टर स्केलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.झटका इतका तीव्र होता की मेक्सिको सिटीमधील इमारती हादरल्या आहेत.

    भूकंपशास्त्रज्ञ आणि रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण मेक्सिकोमधील अकापुल्कोमध्ये सुरुवातीला७.० तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाच्या हादऱ्यात नुकसीनीचीही नोंद झाली आहे. अमेरिकन त्सुनामी चेतावणी प्रणालीचे म्हणणे आहे की, मेक्सिकोच्या ग्युरेरोमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर त्सुनामीचा धोका आहे.

    यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS)ने भूकंपाचा केंद्रबिंदू ७.०दिला होता. जो पूर्वीच्या ७. ४च्या अंदाजापेक्षा कमी होता. तो पृष्ठभागापासून सुमारे १२ किलोमीटर खाली धडकला, ज्यामुळे तो भूकंप आणखीन उथळला. नुकसानीची किंवा जीवितहानीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र भूकंपाचे धक्के मेक्सिको सिटीपासून दूरपर्यंत जाणवले. यापूर्वी जून २०२० मध्ये मेक्सिकोमध्ये भूकंपाचे जोरदार हादरे बसले होते. ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच ३०हून अधिक इमारतींचे नुकसान झाले होते .