सेक्स करण्याची इच्छा वाढायला लागली; स्वत:वर कंट्रोलच होत नव्हत म्हणून त्याने… ‘स्पा’ सेंटरमधील आठ महिलांचा धक्कादायकरित्या मृत्यू

आरोपीला सेक्सचे व्यसन जडले होते. तो सेक्सच्या आहारी गेला होता. त्याला सतत या स्पा सेंटरमध्ये जायची इच्छा होत होती. यामुळे त्याची सेक्स करण्याची इच्छाही वाढायला लागली होती. ही इच्छा कमी करण्यासाठी स्पा सेंटर उध्वस्त करण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि त्याने थेट स्पा सेंटरवर हल्ला चढवला.

    वॉशिंग्टन : कोणतीही व्यसन वाईटचं. मात्र, सेक्सच व्यसन सोडण्याच्या नादात एका अमेरिकेतील एका तरुणाने केलेलं कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. यात आठ महिलांचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे.

    काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील अटलांटा भागात असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला होता. या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एरॉन लाँग या 21 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. वर्णद्वेषातून त्याने हा हल्ला केल्याची भीती वर्तवण्यात येत होती. मात्र, पोलिस तपासात या हल्ल्यामागे भयानक कारण उघडकीस आले आहे.

    आरोपीला सेक्सचे व्यसन जडले होते. तो सेक्सच्या आहारी गेला होता. त्याला सतत या स्पा सेंटरमध्ये जायची इच्छा होत होती. यामुळे त्याची सेक्स करण्याची इच्छाही वाढायला लागली होती. ही इच्छा कमी करण्यासाठी स्पा सेंटर उध्वस्त करण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि त्याने थेट स्पा सेंटरवर हल्ला चढवला.

    स्पा सेंटरमध्ये त्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. आरोपी सेक्सचे व्यसन सोडवण्यासाठी एका पुनर्वसन केंद्रात उपचार घेत होता. जवळपास सहा महिने तो तिथे असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.