ऐकावं ते नवलंच ! म्हणे, एलियनसोबत सेक्स केलं ; ब्रिटनमधील शेकडो नागरिकांचा दावा

ब्रिटनमध्ये एक दोघे नव्हे तर तब्बल ३०० जणांनी असा दावा केला आहे की त्यांनी एलियनसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. एका सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी हिरव्या रंगाच्या छोट्या आकाराच्या स्त्री पुरुषांशी शरीरसंबंध ठेवले आहेत.

    दैनंदिन जीवनात आपण अनेक अजबगजब गोष्टी ऐकतो. मात्र ब्रिटनच्या लोकांची ही गोष्ट ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ब्रिटनमध्ये अनेक लोकांनी एक विचित्र दावा केला आहे.ज्यात अनेकांनी एलियन म्हणजेच परग्रहावर असलेलया लोकांसोबत सेक्स केल्याचा दावा केला आहे.

    ३०० जणांनी केला दावा

    ब्रिटनमध्ये एक दोघे नव्हे तर तब्बल ३०० जणांनी असा दावा केला आहे की त्यांनी एलियनसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. एका सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी हिरव्या रंगाच्या छोट्या आकाराच्या स्त्री पुरुषांशी शरीरसंबंध ठेवले आहेत. या वेबसाईटचं नाव बजबिंगो डॉट कॉम असं आहे. या वेबसाईटवर हे सर्वेक्षण करण्यात आलं.या सर्वेक्षणात सहभाग घेणारे बहुतांश लोक नोरफोक काउंटीतील एलियनचा हॉट स्पॉट मानलं जाणाऱ्या नॉर्विच शहरात रहणारी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हा दावा केला आहे. तसच या शहरात अजब घटना घडण्याच प्रमाण वाढलं आहे.अर्थात या दाव्यावर कुणाचा विश्वास नसला तरी या दाव्याने खळबळ माजली आहे.