धक्कादायक ! ‘सेक्स पार्टी’मध्ये ३०० जण सामील ; अनेकांना कोरोनाची लागण

वॉशिंग्टन : वॉशिंग्टनमध्ये एक धक्कदायक प्रकार घडला आहे. ५ दिवस चाललेल्या एका 'सेक्स पार्टी' इव्हेंटनंतर ४१ लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे. या पार्टीत जवळपास ३०० लोक एकत्र आले होते.

वॉशिंग्टन : वॉशिंग्टनमध्ये एक धक्कदायक प्रकार घडला आहे. ५ दिवस चाललेल्या एका ‘सेक्स पार्टी’ इव्हेंटनंतर ४१ लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे. या पार्टीत जवळपास ३०० लोक एकत्र आले होते.

अमेरिकेतील न्यू ओरलिएन्समध्ये नोव्हेंबर महिन्यात ‘नॉटी इन नॉलिन्स’ (Naughty in N’awlins’) नावाच्या इव्हेंटमध्ये 41 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या इव्हेंटचे सीईओ आणि फाउंडर बॉब हॅनफोर्ड यांनी आपल्या इव्हेंटमधील लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दुख: व्यक्त केलं आहे. यात पार्टीत आलेल्या त्यांच्या एका खास मित्रालाही लागण झाली असून त्याची स्थिती गंभीर आहे, अशी माहिती बॉब यांनी आपल्या एका ब्लॉगमध्ये लिहिली आहे.

‘असं काही होईल याची कल्पना असती, तर ही पार्टी मी कधीही ऑर्गेनाईज केली नसती. इव्हेंट केल्यानंतर आता याबद्दल मला सतत त्रास होत असून सर्व काही ठिक होत नाही तोपर्यंत माझी अशीच स्थिती राहील’, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच या इव्हेंटसाठी कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं होतं आणि व्हायरसपासून बचावासाठी कठोर बंदोबस्तही केल्याचं त्यांनी सांगितलं.सर्व लोक येण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. इव्हेंट दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं. लोकांनी मास्क लावले होते. केवळ खाण्या-पिण्यावेळी मास्क न लावण्याची परवानगी होती. सॅनिटायजरची सोय करण्यात आली होती. शहरातील कोरोना गाईडलाईन्सनुसार, इव्हेंटमध्ये डान्स फ्लोअरची व्यवस्थाही केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.या इव्हेंटच्या फाउंडरने, पार्टीआधी कोरोना व्हायरसच्या सुरक्षेसाठी जबरदस्त तयारी करण्यात आली होती. परंतु पार्टीनंतर अनेकांनी मेसेज करून कोरोनाची लागण झाल्याचं सांगितल्यानंतर, कुठे ना कुठे तयारी अपुरी ठरल्याचं म्हणत त्यांनी दुख: व्यक्त केलं आहे.