washing-and-reselling-used-condoms

पोलिसांनी त्या कारखान्यावर छापा टाकला ज्यामध्ये ३ लाखाहून अधिक वापरलेले कंडोम घटनास्थळावर सापडले. येथे अंदाजे ४ लाख यूझ कंडोम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी कारखाना सील केला आहे. पोलिसांनी एकूणच ३ लाख २४ हजार कंडोम सील केले आहेत.

व्हिएतनाम : कोरोना काळात, जगभरातील लोक आपली घरे, कार्यालये आणि जवळपासचे क्षेत्र स्वच्छतेसाठी, सुरक्षिततेसाठी सतत उपाययोजना करत आहेत. प्रत्येकजण संरक्षणाचा विचार करतो. व्हिएतनाममधील कंपनीत ( condoms Factory) छापा टाकण्यात आला तेव्हा जे दृष्य उघडकीस आले त्यावर तुम्ही परत संरक्षणाबाबत (Protection) विचार कराल. या कंपनीत वापरलेले कंडोम (Used condoms) लोकांना विकले (reselling) जात होते. येथे प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या कंडोमला पुन्हा स्वच्छ (Condoms Recycle) करुन पॅक केला जात होता.

हे तुम्हाला आश्चर्यचकित करेल, परंतु हे खरे आहे आणि मोठ्या कारखान्यातून सुमारे ३ लाख वापरलेले कंडोम जप्त ( condoms Seized) केले आहेत. व्हिएतनाममधील जुन्या कारखान्यात वापरलेले कंडोम पुन्हा दुरुस्त करुन विकले जात होते.


पोलिसांनी त्या कारखान्यावर छापा टाकला ज्यामध्ये ३ लाखाहून अधिक वापरलेले कंडोम घटनास्थळावर सापडले. येथे अंदाजे ४ लाख यूझ कंडोम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी कारखाना सील केला आहे. पोलिसांनी एकूणच ३ लाख २४ हजार कंडोम सील केले आहेत.

कंडोम पुन्हा धुऊन करत होते विक्री

एक संपूर्ण टोळी होती. जे लोक रस्त्यांमधून वापरलेले कंडोम उचलून घेत होते. ते पुन्हा धुवून वाळवून ते पॅक करत असत. यानंतर त्या पुन्हा बाजारात विकल्या गेल्या. वापरलेल्या कंडोमला सर्फने धुतले जात होते.

मालकावर होणार कडक कारवाई

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालकाने कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे लवकरच त्यावर कडक कारवाई केली जाईल. कंडोम हा एकदाच वापरण्यासाठी बनवण्यात आला आहे. पुन्हा वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थीतीत कारखान्याच्या मालकाला लोकांच्या आयुष्याशी खेळणे महागात पडणार आहे. या घटनेबाबत स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण अतापर्यंत या कंपनीतुन हजारो कंडोम विक्रीसाठी नेण्यात आले आहेत.

आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा कंडोममुळे वापरकर्त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. रोग नियंत्रण प्रतिबंध केंद्रानीही असा इशारा दिला की कंडोम धुऊन घेतला असता तरीही कधीही पुन्हा वापरू नये. कंडोमचा पुन्हा वापर करणे किंवा एकावेळी एकापेक्षा जास्त वापर करणे यासारख्या चुकीच्या वापरामुळे कंडोम फुटणे, घसरणे किंवा गळती होऊ शकतो.