धक्कादायक! सुपरमार्केटमध्ये माथेफिरुने धनुष्य-बाणाने केला हल्ला, ५ जणांचा मृत्यू, २ जण जखमी, नॉर्वेतील घटना

माथेफिरु हल्लेखोराने कूप एक्स्ट्रा सुपरमार्केटमध्ये शिरुन लोकांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कसून शोध घेतल्य्नंतंर, या हल्लेखोराला अटक करण्यात आली. नॉर्वे देशाची ओळख ही शांतताप्रिय देश अशी आहे, यापूर्वी कधीही या देशात असे हल्ले झाल्याचे ऐकिवात नव्हते.

    कोंग्सबर्ग : नॉर्वेत कोंग्सबर्ग शहरात मंगळवारी रात्री एका व्यक्तीने सुपर मार्केटमध्ये धनुष्य बाणाने हल्ला केला. यात पाच जण ठार झाले आहेत, तर दोघे जण जखमी झाले आहेत. या हल्लेखओराला पोलिसांनीं अटक केली आहे.

    अनेक ठिकाणी केले हल्ले
    स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या माथेफिरु हल्लेखोराने कूप एक्स्ट्रा सुपरमार्केटमध्ये शिरुन लोकांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कसून शोध घेतल्य्नंतंर, या हल्लेखोराला अटक करण्यात आली. नॉर्वे देशाची ओळख ही शांतताप्रिय देश अशी आहे, यापूर्वी कधीही या देशात असे हल्ले झाल्याचे ऐकिवात नव्हते. झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न आहे, की वैयक्तिक वादविवादातून हा हल्ला झाला, याबाबत पोलीस अद्याप तरी काही माहिती देत नाहीतेय.

    हल्लेखोराला अटक केली, यापलिकडे काहीही सांगण्यास पोलीस अधिकारी तयार नाहीत. ज्या ज्या ठिकाणी हल्लेखोराने हल्ले केलेत, ते एकट्यानेच केले असल्याचे समोर आले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींच्या नावाची यादीही अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

    हल्लेखोराने शहराच्या सर्वात गर्दी असलेल्या चौकात पहिल्यांदा हल्ला केला. त्यानंतर तो आजूबाजूच्या परिसरात पळाला. सुपर मार्केटमध्येही त्याने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली आहे. हेलिकॉप्टर आणि बॉम्ब स्कॉड पथकाच्या सहाय्याने माथेफिरुचा शोध घेण्यात आला.