इंडोनेशिया : कुकरसोबत केलं भावाने लग्न, फोटो झाले व्हायरल, काही वेळातच काडीमोडही घेतला

इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, या भावाने एका इलेक्ट्रिक कुकरसोबत (Electric Cooker) लग्न केलं आहे. त्याने त्याच कुकरसोबत लग्नगाठ बांधली आहे ज्यात तो स्वयंपाक करत होता.

  लग्नाबाबत (Wedding) प्रत्येकाला असंच वाटतं की, त्याचा जोडीदाराने (Partner) त्याचं आयुष्य आणखी सोपं करावं. त्याच्या उणीवा सुधाराव्यात. पण एका भावाने लग्नाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं आहे. इंडोनेशियात (Indonesia) राहणाऱ्या या भावाने प्रेशर कुकरसोबत लग्न केलं आहे (Marries with Pressure Cooker).

  इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, या भावाने एका इलेक्ट्रिक कुकरसोबत (Electric Cooker) लग्न केलं आहे. त्याने त्याच कुकरसोबत लग्नगाठ बांधली आहे ज्यात तो स्वयंपाक करत होता.

  व्हायरल होत आहेत फोटो

  या भावाच्या लग्नाचे फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहेत. या भावाचं नाव Khoirul Anam असल्याचं सांगितलं आहे. त्याचे स्वत: फेसबुकवर लग्नाचे फोटो शेअर केले होते. यात तो कुकर हातात घेऊन. लग्नाचा पोशाख घालून उभा आहे.

  लग्नाच्या काही वेळानंतर या भावाने या कुकरपासून फारकत घेतली आहे. तो फक्त भातच शिजवतो असं सांगत काडीमोडही घेतला असल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.

  लोकं हे फोटो पाहून हैराण झाले आहेत. तुम्हाला काय वाटतं?