धक्कादायक! लाइव्ह शोदरम्यान पत्रकाराच्या डोक्यावर पडला टेलिव्हिजन सेट

स्टुडिओमध्ये लाइव्ह शोदरम्यान एका पत्रकारावर भला मोठा टेलिव्हिजन सेट पडला, ज्यात तो जखमी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. टीव्ही चॅनल ईएसपीएन कोलंबिया येथे काम करणारे कार्लोस ओर्डूज या अपघातात जखम झाले आहेत

    दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे स्टुडिओमध्ये लाइव्ह शोदरम्यान एका पत्रकारावर भला मोठा टेलिव्हिजन सेट पडला, ज्यात तो जखमी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. टीव्ही चॅनल ईएसपीएन कोलंबिया येथे काम करणारे कार्लोस ओर्डूज या अपघातात जखम झाले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातील पाहू शकतो की, स्टुडिओमध्ये सहा जणं उपस्थित आहेत. तेव्हाच कोपऱ्यात बसलेल्या एका पत्रकाराच्या डोक्यात टीव्हीचा सेट पडतो. टीव्ही इतक्या जोरात पत्रकाराच्या अंगावर पडला की, तो त्याच दबला गेला. त्यांच्यासोबत बसलेले गेस्ट यामुळे एकदम घाबरुन गेले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर कॅमेरा तातडीने दुसऱ्या पत्रकाराकडे घेण्यात आला व त्याने कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. जगभरातील लाखो लोक हा व्हिडिओ पाहून अनेक प्रतिक्रिया देत आहेत. ज्या वेळी टीव्ही पत्रकाराच्या डोक्यावर टीव्ही पडतो, त्यानंतर एक सहकर्मचारी कार्यक्रमाची जबाबदारी घेत शो पुढे नेतो. या घटनेनंतर स्टुडिओतील सर्वजण हैराण झाले आहेत.

    पत्रकाराने ट्विटरवर केली पोस्ट

    वैद्यकीय तपासानंतर ओर्डुजने सांगितलं की, त्याच्या नाकावर जराशी जखम झाली आहे. त्याशिवाय तो ठणठणीत आहे. त्यानंतर पत्रकाराने स्पॅनिश भाषेत ट्वीटरवर पोस्ट केली की, ज्यांनी माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली, त्यांना सांगू इच्छितो की, माझी प्रकृती चांगली आहे. देवाच्या कृपेने वैद्यकीय तपासात सर्व ठीक असल्याचं समोर आलं आहे. सर्वांचं धन्यवाद आणि अभिवादन!

    यानंतर पत्रकाराने ट्विटरवर व्हिडिओ मेसेज पोस्ट केला, यामध्ये त्याने प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं. अनेक स्पोर्ट्स अँकर आणि पत्रकारांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. हा व्हिडिओ १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.११ हजारांहून अधिकांनी याला लाइक केलं आहे आणि ३३२९ जणांनी शेअर केला आहे. अनेकजण स्टुडिओमध्ये बसलेल्या इतरांविषयी नाराजी व्यक्त करीत आहे. पत्रकारासोबत अपघात घडला तेव्हा कोणीच तातडीने त्याला वाचविण्यासाठी आलं नसल्याची टीका नेटकरी करीत आहेत.