धक्कादायक, जगातली पहिलीच घटना ! वायू प्रदूषणामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

जगात प्रथमच वायू प्रदूषण मृत्यूचे कारण बनले आहे. वायू प्रदूषणामुळे युनायटेड किंग्डम येथील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मुलीच्या मृत्यू दाखल्यावर मृत्यूचे कारण म्हणून वायू प्रदूषण लिहिण्यात आले आहे.

जगात प्रथमच वायू प्रदूषण मृत्यूचे कारण बनले आहे. वायू प्रदूषणामुळे युनायटेड किंग्डम येथील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मुलीच्या मृत्यू दाखल्यावर मृत्यूचे कारण म्हणून वायू प्रदूषण लिहिण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये दम्याच्या अटॅकमुळे एला एडु या नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला. मात्र तेथील कोर्टाने आता याची पुष्टी केली आहे की, एलाच्या मृत्यूचे कारण वायू प्रदूषण होते.

ऐलाच्या आईने कोर्टात भरलेला खटला

एला लंडनच्या दक्षिणपूर्व भागात असलेल्या लेविशॅममध्ये राहत होती. ती दररोज पायी आपल्या शाळेत पोचत असे. फेब्रुवारी २०१३ मध्ये, दम्याने एलाचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूचे कारण म्हणून वायू प्रदूषणाचा समावेश करण्यासाठी आपल्या मुलीच्या निधनानंतर एलाची आई रोजामंद यांनी कायदेशीर लढाई लढली. त्या म्हणाल्या की, सततच्या हवेच्या खराब पातळीमुळे त्यांची मुलगी मरण पावली.

तपास अधिकाऱ्यानेही वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याची केली नोंद

एला कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की वायू प्रदूषण ही आरोग्य आणीबाणी आहे आणि त्यामुळे मृत्यूचे अधिकृत कारण समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन लोकांना धोकादायक प्रदूषणापासून स्वतःचे आरोग्य वाचविणे शक्य होईल. एलाच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या अधिका्याने कबूल केले की श्वास लागल्यामुळे एल्लाचा मृत्यू झाला.