काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून गोळीबार, गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

काबूल आणि अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती पाहिली असता, अत्यंत भीषण आहे.  तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक अफगाण नागरिक काबूल विमानतळावर उपस्थिती दर्शवत आहेत. परंतु आज (रविवार) तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला.

    काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून गोळीबार करण्यात आल्यामुळे अफगाण नागरिकांची धावपळ सुरू होती. आपला जीव वाचवण्यासाठी ते सैरावैरा पळत होते. परंतु गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, काबूल आणि अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती पाहिली असता, अत्यंत भीषण आहे.  तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक अफगाण नागरिक काबूल विमानतळावर उपस्थिती दर्शवत आहेत. परंतु आज (रविवार) तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी अफगाण नागरिकांची धावाधाव सुरू होती. मात्र, गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता ब्रिटीश डिफेन्स मिनीस्टरकडून वर्तवण्यात येत आहे.

    काबुलहून १६८ नागरिक भारतात दाखल

    अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान आज सकाळी काबुलहून १६८ जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. यात अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे.