न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेर गोळीबार; हल्लेखोर जेरबंद

कॅरोल सिंगिंग पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरावर गोळी झाडत त्याला जखमी केले असून ताब्यात घेतलंआहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. न्यूयॉर्क पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, हल्लेखोराने गोळीबार सुरू केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले.

न्यूयॉर्क (Newyork).  कॅरोल सिंगिंग पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरावर गोळी झाडत त्याला जखमी केले असून ताब्यात घेतलंआहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. न्यूयॉर्क पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, हल्लेखोराने गोळीबार सुरू केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले.

‘शूट मी, किल मी…’
मॅनहट्टम येथे हजारो लोक कॉन्सर्टसाठी जमले होते. कॉन्सर्ट संपल्यानंतर लोक तेथून निघत असतानाच हल्लेखोराने गोळीबार सुरू केला. चर्चेच्या पायऱ्यांवर असतानाच हल्लेखोराने गोळीबार सुरू केल्यानंतर एकच धावपळ झाली. मात्र पोलिसांनी गोळीबार केल्यावर हल्लेखोर गंभीर जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हल्लेखोराने आठ ते दहा गोळ्या झाडल्या. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडत जखमी केलं. हल्लेखोर गर्दीवर अंदाधुंदपणे गोळीबार करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी तो “ शूट मी, किल मी” असंही ओरडत होता असं पोलिसांनी सांगितले.