The Signal messaging app logo is seen on a smartphone, in front of the same displayed same logo, in this illustration taken, January 13, 2021. REUTERS/Dado Ruvic - RC2A7L9SIA61
The Signal messaging app logo is seen on a smartphone, in front of the same displayed same logo, in this illustration taken, January 13, 2021. REUTERS/Dado Ruvic - RC2A7L9SIA61

गेल्या काही दिवसात लाखोंच्या संख्येने नवीन डाउनलोड होत असल्यामुळे सिस्टिमवर लोड येत असल्याचं ‘सिग्नल’च्या वतीने जाहीर करण्यात आलंय. ‘सिग्नल’ या कंपनीने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘सिग्नल’ ला काही तांत्रिक अडचण येत असून लवकरात लवकर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हाट्सअपची नवीन पॉलिसी मान्य नसणारे अनेक ग्राहक सध्या ‘सिग्नल’ हे ॲप डाऊनलोड करतायत. गेल्या काही दिवसात हे ॲप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहेत की या ऍपला काही समस्या उद्भवू लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसात लाखोंच्या संख्येने नवीन डाउनलोड होत असल्यामुळे सिस्टिमवर लोड येत असल्याचं ‘सिग्नल’च्या वतीने जाहीर करण्यात आलंय. ‘सिग्नल’ या कंपनीने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘सिग्नल’ ला काही तांत्रिक अडचण येत असून लवकरात लवकर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसी मान्य नसल्यामुळे अचानकपणे ‘सिग्नल’ हे ॲप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी काम सुरू असल्याचं ‘सिग्नल’ च्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, व्हाट्सअपने आपली प्रायव्हसी पॉलिसी पोस्टपोन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा नेमका कसा परिणाम इथून पुढे व्हाट्सअप आणि ‘सिग्नल’ या दोन्ही मेसेजिंग ॲप्सच्या कार्यपद्धतीवर होतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. मात्र व्हाट्सअपची नवीन पॉलिसी आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा हा ‘सिग्नल’ ऍपला होताना सध्यातरी दिसतो आहे. ‘सिग्नल’ ऍपच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ‘सिग्नल’च्या वापरकर्त्यांना एकमेकांना पाठवलेले मेसेजेस सेंड होत नसल्याच्या अडचणी येत आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन आणि डेकस्टॉप ॲप्लिकेशन या दोन्ही ठिकाणांहून पाठवलेले मेसेजेस डिलिव्हर होत नाहीत आणि काही मेसेजेस हे खूप काळानंतर डिलिव्हर होत असल्याच्या तक्रारी सध्या वापरकर्त्यांना येत आहेत. मात्र या तक्रारी तात्पुरत्या स्वरूपाच्या असून लवकरच त्या सोडवल्या जातील अशी ग्वाही ‘सिग्नल’च्या वतीने देण्यात आली आहे.