महाभयंकर! बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितल्याने भावांकडून हातोड्याने बेदम मारहाण ; Video तुफान व्हायरल

नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.

    सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर असतात. आज काळीज हेलून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संपत्तीवरून अनेकदा कुटुंबीयांमध्ये वादविवाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक भयंकर घटना पाकिस्तानच्या पेशावरमध्ये घडली आहे.

    नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल हन्नान या व्यक्तिच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. दोन्ही मुले आफताब आणि अर्षद यांनी आपल्या बहिणीला बेदम मारहाण केली. बहिणीने दरवाजा उघडल्यानंतर दोन्ही भावांनी बहिणीला हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बहीण पडल्यानंतरही ते दोघे तिला मारहाण करत होते. घरातील एक वृद्ध महिला तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र तिलाही धक्काबुक्की करण्यात येते. ही वृद्ध महिला त्यांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.