so he walked 450 km, not four or five; Because when they understood, the police also went crazy

मुंबई : रागाच्या भरात एखादा माणूस काय करेल याचा काही नेम नाही. याची प्रचिती आणणार प्रकार इटलीत घडला आहे. आपला राग शांत करण्यासाठी एका व्यक्तीने थोडी थोडकी नाही तर ४५० किमीची पायपीट केली आहे. या मागचे  कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले.

इटलीमध्ये ही अजब घटना घडली आहे.  बायकोसोबत झालेल्या भांडणामुळे आपला राग शांत करण्यासाठी नवऱ्याने तब्बल ४५० किमीची पायपीट केली.  ही व्यक्ती कोमा शहरात राहते. बायकोशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात तो चालत पह्नो शहरातील एड्रिऑटिक कोस्टजवळ पोहोचला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूचे उल्लंघन केल्यामुळे स्थानिक पोलिसांनी त्याला रात्री दोनच्या सुमारास ताब्यात घेतले. इतक्या लांब पायपीट करण्याचे कारण त्या व्यक्तीने सांगितल्यावर पोलीसदेखील चक्रावून गेले. यानंतर पतीच्या सुटकेसाठी पत्नी पह्नोला पोहोचली. नाईट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी या व्यक्तीला तब्बल ४०० युरो इतका दंड भरावा लागला. दंड  भरून पत्नीने पतीची सुटका केली.