म्हणून… पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम कायमच टिकून राहते; येथे पतीला पाठीवर बांधून धावतात महिला

या स्पर्धेत महिला आणि पुरुषांचा समावेश असतो. यातून महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत, असेच काहीसे सिद्ध होते. माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी नेपाळच्या देवघाट परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी आपल्या पतीला पाठीवर  घेत पळण्याचा प्रयत्न  केला.

    महिला आणि पुरुषांना समान दर्जा मिळावा दोन्ही समान आहेत. या मुद्द्यावर नेहमीच वादविवाद होताना पाहायला मिळतात. भारतातच नाही तर जगभरातील प्रत्येक देशात या मुद्द्यावर वाद झालेले पाहायला मिळतात. परंतु, नेपाळमध्ये वेगळ्याच पद्धतीने या मुद्द्यावर बोलले जाते.

    यासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत महिला आणि पुरुषांचा समावेश असतो. यातून महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत, असेच काहीसे सिद्ध होते. माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी नेपाळच्या देवघाट परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी आपल्या पतीला पाठीवर  घेत पळण्याचा प्रयत्न  केला.

    समानता आणि  जागरूकता वाढविण्यासाठी पतीला पाठीला बांधून धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या १०० मीटर मॅरेथॉनमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील १६ जोडप्यांनी भाग घेतला होता.

    त्यातील एका महिलेने सांगितले की, ‘मी खूप साहस आणि निष्ठेने येथे आली आहे. मी आतापर्यंत जिंकू शकलेली नाही पण महिलांची प्राथमिकता आणि सन्मान हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे.