अमानुषपणाचा कहर – मुलाने रागाच्या भरात आईची केली हत्या, तिच्या मृतदेहाचे हजार तुकडे केले अन्…..

स्पेनमधील एका तरुणानं आपल्या आईसोबत विचित्र प्रकार केला आहे. या युवकानं आईची हत्या(Son Killed His Mother) केली.त्यानंतर तिच्या मृतदेहाचे (Dead Body Cut In Thosand Pieces) एक हजार तुकडे केले.

  स्पेन :आई आणि मुलाचं नात खूप वेगळं असतं.या नात्याची तुलना कुठल्याच नात्याशी करता येत नाही. आई मुलासाठी काहीही करायला तयार असते मात्र अनेकदा मुलंच आईच्या जीवावर उठल्याच्या घटना समोर येत आहेत.

  स्पेनमधील एका तरुणानं आपल्या आईसोबत विचित्र प्रकार केला आहे. या युवकानं आईची हत्या(Son Killed His Mother) केली.त्यानंतर तिच्या मृतदेहाचे (Dead Body Cut In Thosand Pieces) एक हजार तुकडे केले. हे तुकडे त्यानं प्लास्टिकच्या जारमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवले. या तरुणानं आपल्याच आईच्या मृतदेहाचे तुकडे तब्बल एका आठवड्यापर्यंत खाल्ले. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्यानं वेडा असल्याचं भासवलं पण कोर्टामध्ये त्याचं पितळ उघडं पडलं.

  घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर स्पेनच्या वेन्टसमधील मॅड्रीडमध्ये राहणाऱ्या अल्बर्टो सांचेज गोमेज या तरुणाला लोक नरभक्षक म्हणू लागले.एके दिवशी अल्बर्टोचं आईसोबत भांडण झालं.रागात त्यानं आपल्या आईची गळा आवळून हत्या केली.

  अल्बर्टोनं आपल्या आईच्या मृतदेहाचे एक हजारपेक्षा जास्त तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या जारमध्ये बंद करून त्यानं ते फ्रीजमध्ये ठेवले.  आठवडाभरात हे तुकडे कधी शिजवून तर अनेकदा कच्चेही खाल्ले. त्यानं आपल्या कुत्र्यालाही हे तुकडे खाण्यासाठी दिले.

  अल्बर्टोच्या आईच्या एका मैत्रिणीनं ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस या तरुणाच्या घरी पोहोचले असता महिलेच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले.  बेडवर या महिलेचं डोकं, हात आणि हृदय काढून ठेवण्यात आलं होतं. हा व्यक्ती आपल्या कुत्र्यासोबत मिळून आईच्या मृतदेहाचे तुकडे खात होता.

  पोलिसांनी २१ फेब्रुवारीला अल्बर्टोला अटक केली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. कोर्टानं या आरोपीनं सांगितलं, की त्याला वेगवेगळे आवाज येत होते. हे आवाज त्याला आईची हत्या करण्यास सांगत होते. त्याच्या बचावात तरुणाच्या वकिलांनीही त्याला मनोरुग्ण घोषित केलं. मात्र, हे सिद्ध होऊ शकलं नाही. आरोपीनं असंही म्हटलं, की त्याला काहीही आठवत नाही. त्यानं म्हटलं, की मला माझ्या आईची खूप आठवत येते आणि खूप काळजी वाटते. आईची हत्या आणि तिचं मांस खाल्ल्याचं आपल्या लक्षात नसल्याचं या तरुणानं म्हटलं.

  दोन आठवड्याच्या ट्रायलनंतर न्यायालयानं त्याला हत्या आणि मृतदेहासोबत केलेल्या अमानवीय कृत्यासाठी दोषी ठरवलं. तसंच त्याला १५ वर्ष आणि पाच महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.