प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

हे विचित्र प्रकरण अमेरिकेच्या मिशिगनमधील आहे. जिथे न्यायालयाने पालकांना जबरदस्त दंड ठोठावला कारण त्यांनी त्यांच्या मुलाचा 'पॉर्न कलेक्शन' घराबाहेर फेकून दिलं आहे. पालक आपल्या मुलाच्या पॉर्न चित्रपटांच्या कलेक्शनवर खूप नाराज होते, म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले, परंतु त्यांचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे.

    अमेरिका: आजच्या युगात भांडणे-वाद सामान्य झाले आहे. दररोज आपण गल्ली-बोळात होणारी शेजाऱ्यांमधली भांडणे पाहतो. त्याच वेळी, अशी काही घरे आहेत जिथे फक्त पालक आणि मुलांची भांडणे सुरू असतात. अशा अनेक बातम्या देखील कानावर पडतात, जिथे भांडणामुळे प्रकरण इतकं पुढे जातं की, लोकंही गुन्हे करू लागतात, पण आज आपण ज्या बातमीबद्दल बोलत आहोत ती तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आई -वडील आणि मुलगा यांच्यातला हा लढा आहे, जो थेट न्यायालयात गेला.

    हे विचित्र प्रकरण अमेरिकेच्या मिशिगनमधील आहे. जिथे न्यायालयाने पालकांना जबरदस्त दंड ठोठावला कारण त्यांनी त्यांच्या मुलाचा ‘पॉर्न कलेक्शन’ घराबाहेर फेकून दिलं आहे. पालक आपल्या मुलाच्या पॉर्न चित्रपटांच्या कलेक्शनवर खूप नाराज होते, म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले, परंतु त्यांचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे.

    वास्तविक झालं असं की, अमेरिकेतील एका आई-बाबांना आपल्या मुलाच्या पॉर्न पाहण्याच्या सवयीने अतिशय हैराण झाले होते. त्यांच्या मुलाकडे खूप मोठं कलेक्शन होतं. एक दिवस मुलगा कुठेतरी बाहेर गेला होता, त्याच दरम्यान मुलाच्या आई-बाबांनी त्याचं अख्ख कलेक्शनच फेकून दिलं. जेव्हा एक दिवस तो घरी परत आला त्याने पाहिलं की, त्याचं अख्खं कलेक्शनच गायब झालं होतं. यानंतर त्याने त्याच्या आई-बाबांना या विषयी विचारलं तेव्हा या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.

    आपल्या पालकांच्या या अशा वागण्याने मुलगा अतिशय नाराज झाला आणि त्याने थेट आपल्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करताना मुलाने नमूद केलं की, त्याच्या पालकांनी त्याच्या २९ हजार डॉलर्स (जवळपास २१ लाख ३१ हजार ४०७ रुपयांच्या पॉर्न फिल्मचं कलेक्शन फेकून दिलं होतं.

    रिपोर्टनुसार, मिशिगनच्या एका जिल्हा न्यायालयाने आई-बाबांवर ३० हजार डॉलर (जवळपास २२ लाख रुपयां)चा दंड ठोठावला. मुलाचं नाव डेव्हिड आहे आणि तो त्याच्या आई-बाबांपासून वेगळं राहतो. डेव्हिडचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटही झाला आहे.