प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नेपाळमध्ये स्थिर सरकार देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षात पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि त्यांचे विरोधी पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांच्यात प्रचंड कुरघोडी सुरू होती. अखेर पार्टीत उभी फुट पडली असून पक्षाची दोन गटात शकले पडली आहेत. जवळपास 31 महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या कम्युनिस्ट पार्टीचे दोन्ही गट आम्हीच पार्टीचे खरे वारसदार आहोत, हे सांगण्याचा खटाटोप करताना दिसून येतात. पक्षावर संकट ओढवले असतानाच आता चिनी राजदूत हाओ यांकी यांनी पुन्हा नेपाळच्या राजकारणात एन्ट्री करीत नेपाळच्या राष्ट्रपतींची भेट घेतली.

काठमांडू (Kathmandu).  नेपाळमध्ये स्थिर सरकार देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षात पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि त्यांचे विरोधी पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्यात प्रचंड कुरघोडी सुरू होती. अखेर पार्टीत उभी फुट पडली असून पक्षाची दोन गटात शकले पडली आहेत. जवळपास 31 महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या कम्युनिस्ट पार्टीचे दोन्ही गट आम्हीच पार्टीचे खरे वारसदार आहोत, हे सांगण्याचा खटाटोप करताना दिसून येतात. पक्षावर संकट ओढवले असतानाच आता चिनी राजदूत हाओ यांकी यांनी पुन्हा नेपाळच्या राजकारणात एन्ट्री करीत नेपाळच्या राष्ट्रपतींची भेट घेतली.

प्रचंड गटाने केला सत्ता स्थापनेचा दावा
संसद विसर्जित करण्याच्या निर्णयानंतर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि पुष्पकमलकमल दहल प्रचंड यांच्या गटात तणाव निर्माण झाला आहे. सरकारद्वारे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओली आणि प्रचंड गटाने आता नेपाळ निवडणूक आयोगात धाव घेतली असून नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नाव आणि चिन्हावर (सूर्य) दावा केला आहे. अशातच सत्तेसाठीचा हा राजकीय लढा आता पक्ष हस्तांतराच्या उंबरठ्यावर आला आहे. प्रचंड गटाने विरोधी पक्ष जनता समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करीत बहुमताचा दावा केला आहे.

चीनचा हस्तक्षेप
दरम्यान केपी ओली सरकार संकटात आल्यामुळे चिनी राजदूत हाओ यांकी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती बिद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली. नेपाळी राष्ट्रपती पीएम ओली यांच्या समर्थक असून त्यांनीच निवडणुकीची घोषणा केली होती. यापूर्वी नेपाळमध्ये चिनच्या राजदूतांनी ओली सरकार वाचविण्याकरिता पूर्ण ताकद लावली होती. परंतु, त्यांना यश आले नाही. आता पुन्हा एकदा चिनी राजदूताद्वारे नेपाळच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करताना दिसत आहे.

केंद्रीय समितीची बैठक
ओली गटाद्वारे घेण्यात आलेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये ‘प्रचंड’ गटावर पंतप्रधान ओली यांना नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्ष पदावरून हटविणे तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून शिस्तभंगविरोधी कारवाई करण्याची घोषणा केली. यापूर्वी ओली यांनी संघटनेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी मंगळवारी पार्टीची आम सभा घेण्यासाठी ११९९ सदस्यीय नव्या समितीची नियुक्ती केली होती. तर प्रचंड यांच्या नेतृत्वातील गटाने काठमांडू येथे वेगळी केंद्रीय समितीची बैठक घेतली. बैठकीमध्ये माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाल व झालानाथ खनल, माजी कृषी मंत्री घनश्याम भुशाल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत वरिष्ठ नेता माधव कुमार नेपाल यांना सर्वसम्मतीने पार्टीचा दुसरा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रचंड पक्षाचे पहिले अध्यक्ष आहे. बैठकीत पक्षाच्या केंद्रीय समितीतील दोन तृतियांश सदस्य उपस्थित होते.