squirrel hiding walnuts in truck

एका इसमाला त्याच्या पिकअप ट्रकच्या हुडखाली 42 गॅलन म्हणजेच 158 किलो अक्रोड सापडल्यावर तो आश्चर्यचकित झाला आहे. खारुताई हिवाळ्यापूर्वी अन्न साठविण्याच्या त्यांच्या सवयीसाठी ओळखल्या जातात. अमेरिकेच्या उत्तर डकोटामधील फार्गो येथील रहिवासी बिल फिशर यांच्या पिकअप ट्रकच्या हुडलमध्ये एका खारुताईने 158 किलो अक्रोड साठविले होते(squirrel hiding walnuts in truck). गाडीच्या इंजिनभोवती सर्वत्र अक्रोडच होते.

    दिल्ली : एका इसमाला त्याच्या पिकअप ट्रकच्या हुडखाली 42 गॅलन म्हणजेच 158 किलो अक्रोड सापडल्यावर तो आश्चर्यचकित झाला आहे. खारुताई हिवाळ्यापूर्वी अन्न साठविण्याच्या त्यांच्या सवयीसाठी ओळखल्या जातात. अमेरिकेच्या उत्तर डकोटामधील फार्गो येथील रहिवासी बिल फिशर यांच्या पिकअप ट्रकच्या हुडलमध्ये एका खारुताईने 158 किलो अक्रोड साठविले होते(squirrel hiding walnuts in truck). गाडीच्या इंजिनभोवती सर्वत्र अक्रोडच होते.

    बिल यांनी ट्रकची छायाचित्रे आणि त्याच्याभोवती पडलेले अक्रोड देखील शेअर केले आहेत. बिल यांनी पिकअप ट्रक आणि अक्रोडने भरलेल्या बादल्यांची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत.

    अहो या आणि तुमचे सर्व नैसर्गिक ब्लॅक अक्रोड घ्या! 42 गॅलन उपलब्ध. नैसर्गिकरित्या उगवलेला आणि एका खारीने केलेला हा उद्योग. ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच असू शकते, कारण कठोर परिश्रम करणारा झाडाचा रहिवासी आरोग्याच्या कारणांमुळे लवकरच निवृत्त होतोय असे मी ऐकले आहे, असे बिल यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

    एक खारुताई 4 दिवसांत किती अक्रोड साठवू शकते याचा हिशेबच त्यांनी मांडला आहे. 5 गॅलन बादल्या भरून अक्रोड बाहेर काढले आहेत. तर आतील फेंडरमध्ये सफाई करण्यासाठी माझ्याकडे आज वेळ नाही. तेथे आणखीन 2 बादल्या भरून अक्रोड असू शकतात असे बिल यांनी म्हटले आहे.